-
भारतीय संघाचे माजी अष्टपैलू खेळाडू रॉजर बिन्नी यांची बीसीसीआयच्या अध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे. भारतीय क्रिकेट नियामक मंडळाची धुरा आता बिन्नी यांच्या खांद्यावर असणार आहे. खरं तर ते बीसीसीआयचे ३६वे अध्यक्ष झाले आहेत.
-
रॉजर बिन्नी भारताला १९८३ मध्ये पहिला विश्वचषक जिंकवून देणाऱ्या संघाचा भाग राहिले आहेत. त्यांनी या विश्वचषकात सर्वाधिक विकेट्स घेतल्या होत्या. आंतरराष्ट्रीय कारकिर्दीचा विचार केला, तर २७ कसोटी आणि ७२ एकदिवसीय सामन्यांमध्ये बिन्नींनी भारताचे प्रतिनिधित्व केले आहे. कसोटी क्रिकेटमधअये त्यांनी ४७ विकेट्स आणि सोबतच ८३० धावाही केल्या. एकदिवसीय क्रिकेटमध्ये त्यांच्या नावापुढे ७७ विकेट्स घेतल्या.
-
रॉजर बिन्नी भारतीय संघाचे माजी निवडकर्तेही राहिले आहेत. सप्टेंबर २०१२ मध्ये त्यांनी ही जबाबदारी स्वीकारली होती. त्यापूर्वी त्यांनी भारताच्या १९ वर्षाखालील संघाच्या मुख्य प्रशिक्षकाची भूमिका पार पाडली होती. त्यांच्या मार्गदर्शनात या १९ वर्षाखालील संघाने २००० साली विश्वचषक जिंकला होता.
-
बीसीसीआय अध्यक्ष म्हणून मला दोन गोष्टींवर लक्ष केंद्रित करायचे आहे. पहिले म्हणजे खेळाडूंना दुखापतींपासून दूर ठेवणे. प्रमुख वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहला विश्वचषकाच्या आधी दुखापत झाली. अशा प्रकारांमुळे संघाच्या संपूर्ण योजनेवर परिणाम होतो. मला अशा गोष्टी थांबवण्यासाठी काम करायचे आहे. दुसरे म्हणजे, देशांतर्गत क्रिकेटमध्ये उत्कृष्ट खेळपट्ट्या तयार करणे. ज्यामुळे देशांतर्गत क्रिकेट अधिक स्पर्धात्मक होईल.
-
आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्त झाल्यानंतर त्यांनी राष्ट्रीय क्रिकेट अकादमीचे पहिले संचालकपद भूषवले. त्यानंतर ते भारतीय संघाच्या निवड समितीचे सदस्य देखील होते. तसेच, सध्या ते कर्नाटक क्रिकेट संघटनेचे अध्यक्ष म्हणून कारभार पाहतात.
-
रॉजर बिन्नी यांचे संपूर्ण नाव रॉजर मायकल हम्फ्री बिन्नी असे आहे. ते भारतीय संघाचे पहिले एंग्लो क्रिकेटपटू होते. त्यांचे कुटुंब मुळचे स्कॉटलंडचे आहे, पण त्यांचा जन्म भारतात झाला आणि इथेच मोठे झाले. मुळचे स्कॉटलंडचे आसले, तर नंतर त्यांचे कुटुंब भारतात स्थायिक झाले. बिन्नी कुटुंबाला क्रिकेटची खूपच आवड आहे. वडिलांप्रमाणाचे मुलगा स्टुअर्ट बिन्नी देखील भारतासाठी आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळला आहे.
-
रॉजर बिन्नी यांचे संपूर्ण नाव रॉजर मायकल हम्फ्री बिन्नी असे आहे. ते भारतीय संघाचे पहिले एंग्लो क्रिकेटपटू होते. त्यांचे कुटुंब मुळचे स्कॉटलंडचे आहे, पण त्यांचा जन्म भारतात झाला आणि इथेच मोठे झाले. मुळचे स्कॉटलंडचे आसले, तर नंतर त्यांचे कुटुंब भारतात स्थायिक झाले. बिन्नी कुटुंबाला क्रिकेटची खूपच आवड आहे. वडिलांप्रमाणाचे मुलगा स्टुअर्ट बिन्नी देखील भारतासाठी आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळला आहे.
-
बीसीसीआयचे नवनिर्वाचित अध्यक्ष रॉजर बिन्नी यांनी १९७९ मध्ये आंतरराष्ट्रीय कारकिर्दीला सुरूवात केली होती. त्यांनी पाकिस्तानविरूद्ध बंगळुरू येथे पहिला कसोटी सामना खेळला होता. यानंतर १९८० मध्ये बिन्नी यांनी ऑस्ट्रेलियाविरूद्ध एकदिवसीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले.
-
रॉजर बिन्नी बंगाल क्रिकेट संघाचे प्रशिक्षक देखील राहिले आहेत. सौरव गांगुली यांच्या राज्यात त्यांनी हा पदभार सांभाळला होता. याशिवाय बिन्नी हे भारतीय संघाचे निवडकर्तेही राहिले आहेत. त्यांच्यामुळेच त्यांचा मुलगा स्टुअर्ट बिन्नीला भारतीय संघात स्थान मिळाले, असा आरोपही त्यांच्यावर अनेकदा करण्यात आला.
IND vs PAK: “अरे ए…”, रोहित शर्माचा मेसेज आणि विराटने चौकारासह शतक केलं पूर्ण; शतकानंतर कोहलीने दिली अशी प्रतिक्रिया…पाहा VIDEO