-
ट्वेन्टी-२० विश्वचषक सामन्यात पाकिस्तानला सलग दुसरा झटका बसला आहे. भारताने केलेल्या पराभवातून पाकिस्तान संघ सावरलेला नाही. त्यातच झिम्बाब्वेने अटीतटीच्या सामन्यात पाकिस्तानचा पराभव केला आहे.
-
ट्वेन्टी-२० विश्वचषक स्पर्धेत झिम्बाब्वेने पाकिस्तानचा १ धावाने पराभव केला आहे. पर्थ स्टेडियमवर झालेल्या सामन्यात झिम्बाब्वेने पाकिस्तानला १३१ धावांचे आव्हान दिलं होतं.
-
त्याचा पाठलाग करताना पाकिस्तानाच्या फलंदाजांची दमछाक झाली. १३० धावांमध्येच पाकिस्तानला आपला खेळ गुंडाळावा लागला.
-
या पराभवानंतर पाकिस्तान संघाचा कर्णधार बाबर आझमनेही संघाच्या कामगिरीवर नाराजी जाहीर केली आहे.
-
आमच्या संघाने फारच निराशाजनक कामगिरी केली आहे. आम्ही फलंदाजी अपेक्षेप्रमाणे केली नाही.
-
पहिल्या सहा षटकांमध्ये आम्ही फार वाईट खेळलो. शादाब आणि शान यांनी चांगली भागीदारी केली.
-
पण दुर्दैवाने शादाब बाद झाला आणि त्यानंतर मागोमाग गडी बाद झाले. ज्यामुळे फलंदाजांवर दबाव निर्माण झाला, असं बाबर आझमने सामना संपल्यानंतर बोलताना सांगितलं.
-
पहिल्या सहा षटकांमध्ये आम्ही नव्या चेंडूचा योग्य वापर नाही करत आहोत.
