-
टी२० विश्वचषकाच्या पात्रता फेरीत श्रीलंका वि. संयुक्त अरब अमिराती या सामन्यात युएईच्या जुनैद सिद्दिकीने १०९ मीटरचा लांब षटकार मारला. सध्या तो पहिल्या क्रमांकावर आहे.
-
विश्वचषकाच्या पात्रता फेरीतच जरी वेस्ट इंडिजचा संघ गारद झाला असला तरी आयर्लंड विरुद्धच्या सामन्यात ओडियन स्मिथने १०६ मीटरचा षटकार खेचत तो दुसऱ्या क्रमांकावर आहे.
-
वेस्ट इंडिजच्या दुसरा फलंदाज रोव्हमन पॉवेलने पात्रता फेरीतील झिम्बाब्वेविरुद्धच्या सामन्यात १०४ मीटरचा षटकार मारत तो सध्यातरी तिसऱ्या स्थानी आहे.
-
टी२० विश्वचषक २०२२ चे यजमानपद भूषवणाऱ्या ऑस्ट्रेलियाने सुपर-१२ मधील पहिला सामना न्यूझीलंडविरुद्ध गमावला. मात्र त्याच सामन्यात ऑस्ट्रेलियाचा कर्णधार अॅरॉन फिंचने १०२ मीटरचा उत्कृष्ट असा षटकार मारला. सध्या तो या यादीत चौथ्या स्थानी आहे.
-
स्कॉटलंडचा संघ जरी सुपर-१२ मध्ये पात्र होऊ शकला नाही तरी सुद्धा त्याच्या संघाने शेवटपर्यंत दमदार खेळीचे प्रदर्शन दाखवले. स्कॉटलंडचा धडाकेबाज मायकेल जोन्स याने आयर्लंडविरुद्धच्या सामन्यात ९८.५७ मीटरचा षटकार मारत तो पाचव्या क्रमांकावर आहे.
-
यजमान ऑस्ट्रेलियाने विश्वचषकातील पहिला सामना श्रीलंकेविरुद्ध जिंकत दोन गुण खात्यात जमा केले. त्याच सामन्यात अष्टपैलू खेळाडू मार्कस स्टॉयनिसने शानदार अर्धशतक झळकावले. त्याच सामन्यात त्याने ९८.३६ मीटरचा षटकार मारत सहाव्या स्थानी सध्या आहे.
-
भारत-पाकिस्तान महामुकाबला जरी टीम इंडियाने जिंकला असला तरी त्या सामन्यात इफ्तिखार अहमदने शानदार अर्धशतक झळकावत पाकिस्तानला दीडशेपार धावसंख्या करण्यास मदत केली. त्याने फिरकीपटू अक्षर पटेलला ९७.७८ मीटरचा षटकार मारला असून सध्या तो सातव्या क्रमांकावर आहे.
-
याच यादीत ऑस्ट्रेलियाच्याच एक अष्टपैलू खेळाडू मिचेल मार्शने न्यूझीलंडच्या सामन्यात ९७.२४ मीटरचा षटकार मारला असून सध्या तरी तो आठव्या स्थानी आहे.
-
दक्षिण आफ्रिकेचा शतकवीर रिली रोसोवने बांगलादेश विरुद्धच्या सामन्यात शानदार शतक झळकावत मोठा विजय मिळवून दिला. त्याच सामन्यात त्याने ९७.११ मीटरचा षटकार मारला. सध्या तो नवव्या स्थानी आहे.

Champions Trophy: “हे फारच चुकीचं होतं…”, डेव्हिड मिलरने आफ्रिकेच्या पराभवाचं खापर ICCवर फोडलं, सामन्यानंतर दुबईला जाण्यावरून सुनावलं