-
भारत आणि झिम्बाब्वे यांच्यात झालेल्या सामन्यात भारतीय फलंदाजांनी तुफान फलंदाजी करत झिम्बाब्वेच्या गोलंदाजांची अक्षरशः पळता भूई थोडी केली. यात केएल राहुलचे अर्धशतक आणि सूर्यकुमार यादव याच्या वादळी अर्धशतकाच्या जोरावर भारताने झिम्बाब्वेसमोर भलेमोठे आव्हान ठेवले होते.
-
सुर्यकुमार यादव याने वादळी अर्धशतकासह खास विक्रमही केला. सूर्यकुमार याने या सामन्यात अवघ्या २५ चेंडूत ६१ धावा चोपल्या. या धावा चोपताना त्याने ४ षटकार आणि ६ चौकारही मारले. यामुळे त्याच्या नावावर खास विक्रमाची नोंद झाली. विशेष म्हणजे, असा विक्रम भारताच्या कुठल्याही फलंदाजाला जमला नव्हता.
-
सुर्यकुमार यादव याने या सामन्यात अर्धशतक झळकावत एका वर्षात टी२० क्रिकेटमध्ये (आंतरराष्ट्रीय स्तरावर) एक हजार धावा पूर्ण केल्या. अशी कामगिरी करणारा तो पहिलाच भारतीय फलंदाज ठरला आहे. महत्त्वाचं म्हणजे, सूर्यकुमार यादवपूर्वी पाकिस्तानच्या एका खेळाडूने असा कारनामा केला होता.
-
सुर्यकुमारविषयी रोहितचे मोठे वक्तव्य म्हणाला, “तो संघासाठी जे काही करत आहे, ते प्रशंसेयोग्य आहे. फलंदाजी करण्यासोबतच इतर खेळाडूंवरील दबाव दूर करणे हे संघाच्या दृष्टीने सर्वात महत्त्वाचे आहे. आम्हाला त्याची क्षमता माहितीये आणि त्याच्यामुळे इतर फलंदाजांना वेळही मिळतो.
-
सुर्यकुमार यादव याने या टी२० विश्वचषक २०२२ स्पर्धेमध्ये शानदार फलंदाजी केली आहे. तो या टी२० विश्वचषकात सर्वाधिक धावा करणाऱ्या खेळाडूंच्या यादीत अव्वल तीनमध्ये पोहोचला आहे. विराट या यादीत २४६ धावांसोबत पहिल्या स्थानावर आहे, तर सूर्यकुमारच्या २२५ धावा आहेत.
-
सुर्यकुमारने झाडूचे चित्र दाखवत स्विप शॉट त्याचा आवडता असल्याचे सांगितले. त्यासोबत आत्तापर्यंत त्याची सर्वोत्तम खेळी ही इंग्लंडविरुद्ध ठोकलेले अर्धशतक होते, असे त्याने म्हटले. आपला आयपीएलमधील संघ मुंबई इंडियन्सबाबत बोलताना तो म्हणाला, हा आमचा केवळ संघ नसून एक परिवार आहे.
-
सुर्यकुमारने विराट कोहलीला ‘प्रेरणास्त्रोत’, माजी भारतीय कर्णधार एमएस धोनीला ‘दिग्गज’, त्याचा आयपीएलमधील कर्णधार रोहित शर्माला ‘हिटमॅन’ व सर्वकालीन महान फलंदाज सचिन तेंडुलकरला ‘देव’ असे संबोधले.
-
इरफान पठाणने त्याला ‘डान्सिंग सूर्या’ अशी पदवी दिली. इरफानने त्याला विचारले की, “तुझ्या बुटात काय स्प्रिंग बसवली आहे का?” यावर सुर्यकुमारने हसत उत्तर दिले की, “ मी नेहमी गोलंदाज काय विचार करत असतो यावर माझे फटके ठरवतो.
-
हरभजन सिंगने देखील त्याला प्रश्न विचारला की, “मुंबईचा राजा तू सर्व गोलंदाजांना तर चांगलेच चोपले. तुला हे फटके खेळताना दुखापत होण्याची भीती वाटत नाही का?” यावर सूर्या म्हणाला की, “फटक्यांसाठी नेहमी तयार असतो. मुंबई इंडियन्स कडून खेळताना पहिले सरावादरम्यान थोडी दुखापत झाली होती. पण आता त्याची सवय झाली आहे.
-
“ऑस्ट्रेलिया मध्ये येण्याआधी मला येथील मैदानांची कल्पना होती. येथील मैदाने खूप मोठी आहेत. त्यामुळे आम्ही सराव सामन्यादरम्यान याची सवय करून घेतली होती आणि आज त्याचा मला फायदा झाला.” असे सुर्यकुमारने पुढे उत्तर दिले.
-
जतीन सप्रूने शेवटी एक प्रश्न विचारला की, “ कसे वाटते आहे टीम इंडिया उपांत्य फेरीत पोहचली आहे.” यावर सुर्यकुमार यादवने उत्तर दिले की, “रोहित शर्माच्या कर्णधारपदाच्या नेतृत्वात खेळलो आहे. त्यामुळे आम्ही हा विश्वचषक नक्की जिंकणार असा आम्हला विश्वास वाटायला लागला आहे.
-
सुर्यकुमारने क्रिकेटव्यतिरिक्त आपल्याला कोणत्या गोष्टींमध्ये रस आहे, याबाबत देखील अनेक खुलासे केले. एका चाहत्याने त्याला विचारले, क्रिकेटपटू नसता तर तू काय असता? यावर त्याने ‘अभिनेता’ असे उत्तर दिले. यासोबत त्याने आपला आवडता अभिनेता म्हणून रणबीर कपूरचे नाव घेतले.

Chhaava: मकरंद अनासपुरे ‘छावा’ पाहिल्यावर म्हणाले, “इतिहासाची मोडतोड…”