-
भारतीय टेनिस स्टार सानिया मिर्झा आणि पाकिस्तानी क्रिकेटर शोएब मलिक हे क्रीडा जगतातील तारे आहेत.
-
स्पोर्ट्स पॉवर कपल सानिया, शोएब आणि त्यांचा लाडका मुलगा इझान हे एका परिपूर्ण कुटुंबाचे उदाहरण आहे.
-
तथापि, गेल्या काही दिवसांपासून सानिया मिर्झा आणि शोएब मलिक विभक्त होणार असल्याच्या चर्चांना उधाण आले आहे.
-
सानिया मिर्झा आणि शोएब मलिक यांचे २०१० साली अत्यंत वादग्रस्त वातावरणात लग्न झाले. यावेळी एका महिलेने ती शोएबची पहिली पत्नी असल्याचा दावा केला होता.
-
सानिया आणि शोएब यांनी अलीकडेच त्यांचा मुलगा इझानचा वाढदिवस एकत्र साजरा केला. यासंबंधीचे फोटो शोएबने आपल्या सोशल मीडिया अकाउंटवर शेअर केले होते.
-
परंतु सानियाने तिच्या इन्स्टाग्रामवर या पार्टीचे फोटो पोस्ट केले नाहीत.
-
या गोष्टीने चाहत्यांना विचार करायला भाग पाडले असून यानंतर दोघेही विभक्त होत असल्याच्या अफवा पसरू लागल्या आहेत.
-
काही लोक आरोप करत आहेत की एका शोच्या शूटिंग दरम्यान शोएबने सानियाची फसवणूक केली.
-
तसेच, सानिया आजकाल तिच्या सोशल मीडियावर वाईट काळातील पोस्ट शेअर करत असते.
-
मात्र, अद्याप या गोष्टींबाबत कोणतीही अधिकृत माहिती मिळालेली नाही.
-
दरम्यान, सानिया आणि शोएबनेही या वाढत्या अफवांवर मौन पाळले आहे.
-
सर्व फोटो : इन्स्टाग्राम
माजी आमदार तुकाराम बिडकर यांचे अपघाती निधन, महसूलमंत्र्यांसोबतची भेट ठरली अखेरची