-
T20 World Cup 2022: टीम इंडियाचा धडाकेबाज कर्णधार रोहित शर्मा याला एडिलेड येथे नेट प्रॅक्टिसच्या वेळी दुखापत झाल्याचे वृत्त समोर येत आहे.
-
रोहित शर्माची दुखापत गंभीर असल्यास टीम इंडियाचा उपांत्य फेरीआधी मोठा धक्का बसणार आहे.
-
येत्या दोन दिवसात भारताला इंग्लंड विरुद्ध टी २० वर्ल्डकप मध्ये सेमीफायनलची लढत द्यायची आहे.
-
आतापर्यंत संपूर्ण विश्वचषकात टीम इंडिया दक्षिण आफ्रिकेच्या सामन्याचा अपवाद वगळता अपराजित ठरली होती.
-
मात्र आता दुखापतीमुळे रोहित शर्मा संघात नसल्यास टीमची बांधणी कमकुवत होऊ शकते.
-
एडिलेडमध्ये रोहित शर्माच्या दुखापतीनंतरच्या फोटोमध्ये तरी भारतीय कर्णधाराला वेदना होत असल्याचे स्पष्ट दिसत आहे.
-
रोहितवर मैदानात प्राथमिक उपचार करण्यात आले असून टीम इंडियाचे वैद्यकीय तज्ज्ञ सध्या त्याची काळजी घेत आहेत.
-
टी २० विश्वचषक ग्रुप २ मध्ये टीम इंडिया आताही सर्वाधिक पॉईंट व नेट रन रेटसह टॉपला आहे.
-
रोहित शर्माची दुखापत कितपत गंभीर आहे अजून समजलेले नाही मात्र समजा शर्मा बाहेर पडल्यास येत्या सामन्यात कर्णधार कोण हा प्रश्न समोर आला होता.
-
रोहित शर्मा नसल्यास के. एल. राहुल कर्णधार पदाची जबाबदारी सांभाळू शकतो.व त्याच्यासह विराट व ऋषभ पंत सामनावीर म्हणून खेळतील अशी शक्यता होती
-
रोहित शर्माच्या दुखापतीमुळे टीम इंडियाच्या चाहत्यांना धक्का बसला होता, मात्र आता रोहित पुन्हा मैदानात उतरला आहे.
-
रोहित शर्माने आतापर्यंत भारताच्या ५ सामन्यात ८९च धावा केल्या आहेत, मात्र कर्णधार म्हणून रोहितचे अनेक निर्णय योग्य ठरले आहेत.

‘याचा रोल किती हा बोलतो किती?’ संतोष जुवेकर अक्षय खन्नासंदर्भातील ट्रोलिंगबद्दल म्हणाला, “माझं नशीब…”