-
T20 World Cup 2022 Team India Prize Money: भारतीय क्रिकेट संघ ऑस्ट्रेलियात झालेल्या 2022 च्या T20 विश्वचषक स्पर्धेत उपांत्य फेरीतून बाहेर पडला.
-
इंग्लंडसमोर १० विकेटच्या फरकाने २४ बॉल शिल्लक असतानाच झालेला पराभव केवळ खेळाडूच नव्हे तर भारतीयांच्या जिव्हारी लागणारा होता.
-
मात्र, टी २० विश्वचषकातून बाहेर पडूनही टीम इंडियाने लाखो मनं व कोट्यवधी रुपये जिंकले आहेत.
-
आयसीसीच्या घोषणेनुसार विविध फेऱ्यांमध्ये टीम इंडियाने किती रुपयांची बक्षिसे जिंकली ही आता आपण पाहणार आहोत.
-
आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने स्पर्धा सुरू होण्यापूर्वी जाहीर केल्याप्रमाणे, स्पर्धेतील विजेत्याला १. ६ मिलियन तर उपविजेत्याला ०.८ मिलियनचे बक्षीस मिळणार आहे.
-
सुपर १२ च्या सामन्यांमधील इतर 8 संघांसाठी, प्रत्येकी ७०,००० डॉलर इतकी बक्षिसाची रक्कम घोषित करण्यात आली होती.
-
आयसीसीच्या घोषणेनुसार, टी २० विश्वचषकाच्या उपांत्य फेरीतील चारही संघांना ४ लाख डॉलर म्हणजेच जवळपास ३ कोटी २५ लाख रुपये मिळणार आहे.
-
भारत व न्यूझीलंडला सवा तीन कोटीच्या बक्षिसावर समाधान मानावे लागणार आहे.
-
टी २० विश्वचषकाच्या उपांत्य फेरीत पाकिस्तानने न्यूझीलंडला तर इंग्लंडने भारताला पराभूत करून आपले अंतिम फेरीतील स्थान निश्चित केले होते.
-
सुपर १२ च्या गटातून, सेमीफायनलचा टप्पा पार करून पाकिस्तान व इंग्लंड हे दोन संघ अंतिम सामन्यात आमनेसामने येणार आहेत.
-
टी २० विश्वचषकाचा महाअंतिम सामना हा १३ नोव्हेंबरला मेलबर्न क्रिकेट मैदानात रंगणार आहे.

३०० कोटी तुझ्यामुळे जमले नाहीत…; मराठी अभिनेता सिद्धार्थ जाधव ट्रोलिंगवर म्हणाला, “मी ज्या झोपडपट्टीतून…”