-
आयपीएल २०२३ ची रिटेंशन यादी मंगळवारी (१५ नोव्हेंबर) प्रसिद्ध करण्यात आली. विशेष बाब म्हणजे लिलावाआधी आयपीएल संघांनी या खेळाडूंना संघात कायम ठेवले असून काहीना मात्र बाहेरचा रस्ता दाखवला आहे. रिटेन्शन प्रक्रिया संपल्यानंतर २३ डिसेंबर रोजी कोची येथे होणाऱ्या मिनी लिलावाकडे सर्व संघांचे लक्ष लागले आहे.
-
आगामी २०२३च्या आयपीएल हंगामासाठी सर्व फ्रँचायझींनी तयारी सुरू केली आहे. खरं तर २०२३च्या आयपीएल हंगामात मोठे बदल पाहायला मिळणार आहेत. कारण काही संघानी स्टार खेळाडूंचा पत्ता कट केला, तर काही विदेशी खेळाडूंनी आयपीएलमधून माघार घेतली आहे. अशातच रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूच्या फ्रँचायझीने कायम ठेवलेल्या खेळाडूंची यादी जाहीर केली आहे. लक्षणीय बाब म्हणजे आरसीबीने अनीश्वर गौतम, चमा मिलिंद, लुवनित सिसोदिया, शेर्फन रदरफोर्ड या चौघांना संघातून बाहेर केले आहे.
-
चेन्नई सुपर किंग्सने इंडियन प्रीमिअर लीगच्या पुढील पर्वासाठी अष्टपैलू खेळाडू रवींद्र जडेजा याला संघात कायम ठेवले. आयपीएल २०२२नंतर जडेजा आणि सीएसके यांच्यातील संबंध ताणले गेले होते. परंतु तो सीएसकेच्या पिवळ्या जर्सीतच रविंद्र जडेजा दिसणार आहे. जडेजानेही ‘Everything is fine’ #Restart असे तीन शब्दांचं ट्विट केलं आणि त्यात धोनीसोबतचा फोटो पोस्ट केला. ड्वॅन ब्राव्हो, रॉबिन उथप्पा, एडम मिल्ने, हरी निशांत, क्रिस जॉर्डन, भगत वर्मा, केएम आसिफ, नारायण जगदीशन यांना चेन्नईने करारातून मुक्त केले आहे.
-
आयपीएल २०२३ साठी होणाऱ्या मिनी ऑक्शन होणार आहे आणि आज फ्रँचायझींनी त्यांच्या ताफ्यातून रिलीज केलेल्या व रिटेन केलेल्या खेळाडूंची यादी जाहीर केली. बीसीसीआयने १५ नोव्हेंबर ही खेळाडूंची अदलाबदल करण्यासाठी शेवटची तारीख दिली होती. या तारखेआधीच दिल्ली कॅपिटल्सने आगामी हंगामासाठी शार्दुल ठाकूरला केकेआरच्या ताफ्यात दिलं आहे. टीम सेफर्ट, आश्विन हेब्बार, के.एस.भारत आणि मनदीप सिंग या चौघांना दिल्लीने बाहेरचा रस्ता दाखवला आहे.
-
आयपीएलच्या १४व्या हंगामात दाखला झालेल्या गुजरात टायटन्सने विजेतेपद पटकावत शानदार विजय मिळवला होता. त्यांनी देखील आपल्या संघात कायम राखलेल्या खेळाडूंची यादी जाहीर केली. त्यात भारताचे दोन आणि परदेशी खेळाडूंना (डॉमनिक ड्रेक्स, गुरकिरत मान, जेसन रॉय, वरुण एरॉन) करारातून मुक्त करण्यात आले.
-
कोलकाता नाईट रायडर्समधून पॅट कमिंस, सॅम बिलिंग्स आणि एलेक्स हेल्स यांनी माघार घेतली आहे. आपल्या देशाकडून खेळण्यासाठी या तीन खेळाडूंनी आयपीएल न खेळण्याचा निर्णय घेतला आहे. २०२३ मध्ये अॅशेस मालिका खेळवली जाणार आहे, तसंच एकदिवसीय विश्वचषक ही होणार आहे.
-
केएल राहुलच्या नेतृत्वाखालील लखनऊ सुपर जायंट्सने मागील हंगामात शानदार खेळी केली होती. पहिल्याच प्रयत्नात लखनऊ सुपर जायंट्स संघ बाद फेरीपर्यंत पोहचला होता. लखनऊने महत्वाची कामगिरी करणाऱ्या वेस्ट इंडीजच्या जेसन होल्डरला संघाने करारमुक्त केले. याचसोबत मनिष पांडेलाही यंदा लखनऊच्या संघात स्थान मिळालेलं नाहीये. त्याच बरोबर अँड्रू टाय, अंकीत राजपूत, दुष्मंता चमीरा, एव्हिन लुईस, आणि शाहबाज नदीम या तब्बल सात जणांना संघाने करारमुक्त केले.
-
आयपीएलच्या १५व्या हंगामाआधी पंजाब किंग्सने कर्णधारासह प्रमुख खेळाडूंना बाहेरचा रस्ता दाखवला आहे. पंजाब किंग्सने मयांक अग्रवालला रिलीज केलं आहे. मयांकसह ओडीयन स्मिथ, वैभव अरोरा, बेनी हॉवेल, इशान पोरेल, अंश पटेल, प्रेरक मंकड, संदीप शर्मा आणि ऋतीक चॅटर्जी यांचाही संघाने पत्ता कट केला.
-
आयपीएलमध्ये सर्वात यशस्वी संघ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या रोहित शर्माच्या मुंबई इंडियन्स संघाने तब्बल १३ खेळाडूंना रामराम ठोकला आहे. वेस्ट इंडीजचा धडाकेबाज खेळाडू कायरन पोलार्डने आयपीएलमधून निवृत्ती घोषित केली असून तो आता मुंबईचा फलंदाजी प्रशिक्षक म्हणून दिसणार आहे. कायरन पोलार्डच्या खांद्यावर फलंदाजी प्रशिक्षकपदाची जबाबदारी दिल्यानंतर मुंबई इंडियन्सने आणखी काही खेळाडूंना करारमुक्त केलं आहे. त्यात अनमोलप्रीत सिंग, आर्यन जुयाल, बसील थंपी, डॅनियल सॅम्स, फॅबियन एलन, जयदेव उनाडकट, मयंक मार्कंडे, मुरुगन अश्विन, राहुल बुद्धी, रिले मेरेडिथ, संजय यादव आणि टायमल मिल्स यांचा समावेश आहे.
-
राजस्थान रॉयल्स आगामी हंगामाकरिता सज्ज झाला असून त्यांनी नवीन संघ बांधणीसाठी अनुनय सिंग, कॉर्बिन बॉश, डॅरेल मिचेल, जेम्स नीशम, करुण नायर, नॅथन कुल्टर नाईल, रस्सी व्हॅन डर डुसेन, शुभम गरवाल आणि तेजस बरोका यांना करारातून मुक्त केले. युवा कर्णधार संजू सॅमसनच्या नेतृत्वाखाली राजस्थान रॉयल्सचा संघ चांगली कामगिरी करेल अशी आशा सर्वांना वाटते म्हणून त्यालाच कर्णधारपदी कायम ठेवण्यात आले.
-
सनरायझर्स हैदराबातने केन विल्यम्सन, नोकलस पूरन, जगदीश सुचिथ, प्रियम गर्ग, रविकुमार समर्थ, रोमारियो शेफर्ड, सौरभ दुबे, शॉन एबॉट, शशांक सिंह, श्रेयस गोपाल, सुशांत मिश्रा, विष्णु विनोद या खेळाडूंना अलविदा केला आहे. लिलावात आता हैदराबाद नवीन खेळाडूंचा शोध घेणार असून संघ बांधणीसाठी विशेष प्रयत्न करताना दिसेल.
-
यावेळेस सर्वच संघांनी धक्कादायक आणि काही आश्चर्यचकित करणारे निर्णय घेतले. त्यामुळे आता कोणाच्या खात्यात किती पैसे शिल्लक आहे यावर पुढील महिन्यात होणार १५व्या आयपीएलचा लिलाव अवलंबून असणार आहे. वरील छायाचित्रात कोणाकडे किती पैसे आहेत याची माहिती देण्यात आली आहे.

Champions Trophy: “हे फारच चुकीचं होतं…”, डेव्हिड मिलरने आफ्रिकेच्या पराभवाचं खापर ICCवर फोडलं, सामन्यानंतर दुबईला जाण्यावरून सुनावलं