-
महेंद्रसिंग धोनी आता भारतीय क्रिकेट संघाचा भाग नाही. (Photo: BCCI)
-
तो फक्त आयपीएलमध्ये चेन्नई सुपर किंग्सकडून खेळतो. (फोटो – इंडियन एक्सप्रेस)
-
अशातच बीसीसीआय धोनीला राहुल द्रविडपेक्षा मोठी जबाबदारी सोपवणार असल्याचं म्हटलं जातंय. (फोटो – इंडियन एक्सप्रेस)
-
भारताचा न्यूझीलंड दौरा १८ नोव्हेंबरपासून सुरू होत आहे. याचदरम्यान, एका व्हिडीओची बरीच चर्चा होत आहे, ज्यामध्ये न्यूझीलंडचे खेळाडू धोनीबद्दल बोलताना दिसत आहेत.
(Photo: BCCI) -
मालिका सुरू होण्यापूर्वी अॅमेझॉन प्राइमवर एक व्हिडीओ प्रसिद्ध करण्यात आला आहे, ज्यामध्ये न्यूझीलंडचे खेळाडू २०१९च्या विश्वचषक उपांत्य फेरीत धोनीच्या रन आऊटबद्दल बोलताना दिसत आहेत. (Photo: BCCI)
-
२०१९ च्या विश्वचषक उपांत्य फेरीत धोनी रन आऊट झाल्यामुळे भारताचे फायनलमध्ये जाण्याचे व विजयाचे स्वप्न भंगले होते. (Photo: BCCI)
-
न्यूझीलंडचा स्टार क्रिकेटर टिम साऊदीने सांगितले की, धोनी क्रीजवर होता तेव्हा आम्ही सगळे घाबरलो होतो, कारण तेव्हा काहीही होऊ शकत होतं. जे कोणी महेंद्रसिंग धोनीविरुद्ध खेळलं, त्यांना हे माहीत आहे की जोपर्यंत तो क्रीजवर आहे तोपर्यंत काहीही शक्य आहे. (फोटो – इंडियन एक्सप्रेस)
-
साऊदीच्या मते ‘जोपर्यंत धोनी क्रीजवर होता तोपर्यंत भारताकडे सामना जिंकण्याची संधी होती. पण मार्टिन गप्टिलने त्याला रन आऊट करताच आम्ही सामना जिंकला.’(फोटो – इंडियन एक्सप्रेस)
-
धोनीच्या ऐतिहासिक धावबादची आठवण करून देताना विकेटकीपर टॉम लॅथम म्हणाला, ‘मी स्टंपच्या मागे असायला हवं होतं पण मी चेंडूचा पाठलाग करत होतो.’ (Photo: BCCI)
-
‘गुप्टिलने माझ्याआधी चेंडू पकडला आणि स्टंपकडे फेकला. मला वाटलं की स्टंपवर कोणी तरी असेल, पण तसं नव्हतं, तरी चेंडू थेट स्टंपवर आदळला आणि धोनी आऊट झाला होता, असं लॅथमने सांगितलं. (Photo: BCCI)
-
दरम्यान, धोनी ज्या बॉलवर आऊट झाला, तो नो बॉल होता, असंही काही जणांचं म्हणणं होतं. (फोटो – इंडियन एक्सप्रेस)
-
(फोटो – इंडियन एक्सप्रेस)

Chhaava: मकरंद अनासपुरे ‘छावा’ पाहिल्यावर म्हणाले, “इतिहासाची मोडतोड…”