-
१८ नोव्हेंबर पासून सुरु होणाऱ्या मालिकेआधी भारतीय संघाचा कर्णधार हार्दिक पांड्या आणि न्यूझीलंड संघाचा कर्णधार केन विलियम्सन यांनी वेलिंग्टन च्या स्काय स्टेडियमजवळ फोटोशूट केले.
-
या फोटोशूट दरम्यान स्काय स्टेडीयम जवळच्या रस्त्यावर दोन्ही संघाच्या कर्णधारांनी एका खास रिक्षाने सफारी करण्याचा आनंद लुटला.
-
हार्दिक पांड्या आणि केन विलियम्सन या रिक्षात एकत्र बसले आणि त्यांनी ती स्वतः चालवली. यानंतर दोघेही टी२० ट्रॉफीजवळ पोहोचले, तिथे स्टेडियमच्या बाजूला फोटो देखील काढण्यात आला.
-
हार्दिक-केनने ज्या रिक्षात बसून फोटोशूट केले तिला ‘क्रोकोडाइल बाइक’ म्हणतात. न्यूझीलंडच्या आल्हाददायक वातावरणात मित्र आणि कुटुंब सहलीसाठी बाहेर पडल्यावर या रिक्षाचा आनंद घेतात.
-
भारत वि. न्यूझीलंड द्विपक्षीय टी२० मालिकेत हार्दिक पांड्यावर कर्णधारपदाची तर व्ही.व्ही. एस. लक्ष्मण याच्या खांद्यावर प्रशिक्षक पदाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे.
-
हार्दिक पांड्याकडे टीम इंडियाचा टी२० संघासाठी भविष्यकाळातील कायमस्वरूपी कर्णधाराच्या दृष्टीने बघितले जाते.
-
ऋषभ पंत आणि संजू सॅमसन यांच्याकडे स्वत:ला भारतीय संघातील सर्वोत्तम फिनिशर आणि यष्टीरक्षक म्हणून सिद्ध करण्यासाठी ही एक उत्तम संधी असणार आहे.
-
गोलंदाजीचा विचार केल्यास भारताचा लेग-स्पिनर युजवेंद्र चहल आणि डावखुरा रिस्ट स्पिनर कुलदीप यादव म्हणजेच ‘कुलचा जोडी’ यांच्यावर खरी टीम इंडियाची भिस्त असणार आहे.
-
अनकॅप्ड इशान किशन आणि शुभमन गिल हे टी२० फॉरमॅटमधील पहिल्या सामन्याचे संभाव्य सलामीवीर असू शकतात. फलंदाजीतील प्रयोग सुरू असताना या वर्षी त्यांना सलामीवीर म्हणून न्यूझीलंडमध्ये ठसा उमटवण्याची नामी संधी चालून आली आहे.

मुंबईतल्या अंधेरी स्टेशनवर कपल झालं बेभान; रोमान्स करताना अक्षरश: हद्दच पार केली, लाजीरवाणा VIDEO होतोय व्हायरल