-
शुक्रवारपासून न्यूझीलंडविरुद्ध वेलिंग्टनमध्ये सुरू होणाऱ्या तीन सामन्यांच्या टी२० मालिकेसाठी टीम इंडिया सज्ज झाली आहे. पहिला सामना पावसामुळे जरी वाया गेला असला तरी देखील दुसऱ्या टी२० सामन्यात भारताचा युवा गोलंदाज उमरान मलिकला संधी मिळणार का हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.
-
उमरान मलिकने टी२० आंतरराष्ट्रीय पदार्पण केले आहे आणि त्याने भारतासाठी एकूण तीन सामने खेळले आहेत. यामध्ये त्याने १२.४४च्या इकॉनॉमी रेटने धावा देत दोन विकेट्स घेतल्या. त्याचा वेगच हा सर्वात उल्लेखनीय आहे. तो लागोपाठ १५०किमी वेगाने गोलंदाजी करतो. माजी क्रिकेटपटूंनी त्याचा वेग पाहून म्हटले, ‘तो जसजसा खेळत जाईल तसतशी त्याची गोलंदाजी अधिक उत्तम होत जाईल.’
-
उमरानने नुकतेच इंस्टाग्रामवर एक व्हिडिओ पोस्ट केला, ज्यावरून तो न्यूझीलंड दौऱ्यासाठी तयार असल्याचे दिसून येत आले. त्याआधी त्याने आयपीएलमध्ये १७ सामने खेळले असून त्यामध्ये ८.८३च्या इकॉनॉमी रेटने २४ विकेट्स घेतल्या आहेत. उजव्या हाताच्या या गोलंदाजाचे आंतरराष्ट्रीय पदार्पण हवे तसे झाले नाही. इंग्लंड दौऱ्याच्या टी२० मालिकेत त्याने ४ षटके टाकत सलामीवीर जेसन रॉय याची विकेट घेतली होती.
-
झहीर खान एका कार्यक्रमात म्हणाला, “जर सर्व काही एकाच पॅकेजमध्ये उपलब्ध असेल, तर त्याहूनही चांगले दुसरे काहीच नाही. मात्र ते तसे नसेल, तर तुम्हाला गोलंदाजीच्या आक्रमणातील क्रमवारीमध्ये विविधता वापरणे गरजेचे ठरते आणि वेगवेगळ्या परिस्थितींनुसार त्यात बदल करणे देखील आवश्यक ठरते. उमरान हा एक अतिशय प्रतिभावान गोलंदाज आहे आणि जर त्याने सातत्याने उत्तम प्रदर्शन केले तर त्याचे संघातील स्थान देखील निश्चित होईल.”
-
उमरानच्या वेगवान आक्रमणात विविधता आहे आणि अशा पद्धतीचे अनुसरण करणे ही संघासाठी जमेची बाजू आहे. तुम्हाला डावखुऱ्या तसेच चेंडू स्विंग करू शकेल अशा गोलंदाजाची गरज आहे. म्हणजेच एक परिपूर्ण वेगवान गोलंदाजाची आवश्यकता आहे पण उमरान मलिककडून मला खूप आशा आहे.” कौतुक करताना झहीर खान म्हणाला.
-
भारताच्या उपांत्य फेरीतील मानहानीकारक पराभवानंतर उमरान मलिक चर्चेत आहे. उमरान इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) मध्ये सनरायझर्स हैदराबादकडून खेळतो. याशिवाय तो १८ नोव्हेंबरपासून न्यूझीलंड दौऱ्यासाठी भारतीय क्रिकेट संघाचा भाग आहे.
-
गोलंदाजाकडे सर्वोत्तम वेग असल्याशिवाय पर्याय नाही आणि उमरानकडे तो वेग आहे, त्यामुळे त्याला सर्वोच्च स्तरावर प्रगती करण्यासाठी केवळ चांगल्या प्रदर्शनाची गरज नाही तर तो खेळ पुढे सातत्याने सुरु ठेवणे आवश्यक आहे.
-
रवी शास्त्री त्याच्या विषयी बोलताना म्हणाले, “तो भारतातील सर्वात वेगवान गोलंदाजांपैकी एक आहे आणि विश्वचषकात काय घडले ते तुम्ही पाहिले आहे. हरिस रौफ, नसीम शाह आणि अॅनरिक नॉर्टजे या वेगवान गोलंदाजांनी समोरच्या संघाला नाकीनऊ आणले. त्यामुळे वेगवान गोलंदाजाला पर्याय नाही. जरी तुम्ही छोट्या लक्षाचा बचाव करत असाल, तर उमरानसाठी ही एक संधी आहे, आशा आहे की तो नक्कीच चांगले प्रदर्शन करेल. ”
-
न्यूझीलंडमधील आगामी व्हाईट-बॉल क्रिकेटमध्ये उमरान उत्कृष्ट प्रदर्शन करेल आणि तो त्याच्या कामगिरीच्या जोरावर भारतीय संघात त्याचे स्थान नक्कीच निश्चित करेल. अशी सर्व भारतीय चाहत्यांची इच्छा आहे.
-
उमरान मलिक हा नेहमीच चर्चेत असतो. भारतीय निवड समिती त्याच्या कामगिरीवर लक्ष ठेवून असल्याने प्रत्येकवेळी तो बातम्यांमध्ये चर्चेचा विषय ठरतो.
-
न्यूझीलंड दौऱ्यासाठी वेगवान गोलंदाज उमरान मलिकला टीम इंडियात स्थान मिळाले आहे. त्याचा वेगाचा कहर दाखवण्यासाठी तो सध्या फिटनेसचा सराव करत असून संघ व्यवस्थापन संघात पदार्पणाची संधी मिळणार का? हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.
-
हार्दिक पांड्याच्या नेतृत्वाखाली न्यूझीलंड दौऱ्यावर असणारा भारतीय कशी कामगिरी करतो याकडे बीसीसीआयसह वरिष्ठ खेळाडूंच्या देखील नजरा लागल्या आहेत. खासकरून मोहम्मद शमी, भुवनेश्वर कुमार यांसारख्या गोलंदाजांची जागा काश्मीर एक्स्प्रेस उमरान मलिक घेणार का हे आगामी काळच ठरवेल.

भरलग्नात नवरा-नवरी बेभान! लग्नसोहळ्यात नातेवाईकांसमोर नवरीने केलं असं काही की…, VIDEO पाहून बसेल धक्का