-
फुटबॉल हा जगातील सर्वात लोकप्रिय खेळ आहे. फिफा विश्वचषक २०२२ कतारमध्ये खेळवला जात आहे. येथे ३२ संघ ट्रॉफी जिंकण्यासाठी एकमेकांशी झुंज देताना दिसतील.
-
सर्व संघांची चार-चारच्या गटात विभागणी करण्यात आली असून त्यानंतर उपांत्यपूर्व फेरीचे सामने खेळवले जातील.
-
दरम्यान, रविवार २० नोव्हेंबरला फिफा विश्वचषक २०२२चा उद्घाटन सोहळा पार पडला.
-
कतारमध्ये फिफा विश्वचषकाच्या २२व्या पर्वाला सुरुवात झाली आहे. उद्घाटन सोहळ्यात उपस्थित कलाकारांनी रसिकांची मने जिंकली.
-
कतारचे अमीर शेख तमीम बिन हमाद अल थानी यांनी प्रेक्षकांना इंग्रजी आणि अरबी भाषेत अभिवादन केले.
-
फिफा विश्वचषक २०२२ चा उद्घाटन सोहळा अल बायत स्टेडियमवर पार पडला. या स्टेडियममध्ये सहा हजार प्रेक्षक आरामात बसू शकतात.
-
दक्षिण कोरियन रॉक बँड बीटीएसने उद्घाटन समारंभात सादरीकरण केले. यावेळी बँडच्या सात सदस्यांपैकी एक असलेल्या जंगकूकने सर्वांचेच लक्ष वेदून घेतले.
-
यावेळी जंगकूकसह, कतारी गायक फहाद अल-कुबैसी याचेही सुंदर सादरीकरण पाहायला मिळाले.
-
फिफा विश्वचषक उद्घाटन समारंभात, यूएस अभिनेता मॉर्गन फ्रीमन डब्ल्यूसी अँबॅसिडर घनिम अल मुफ्ताह यांच्याशी गप्पा मारताना दिसले.
-
कतारमध्ये होणाऱ्या फिफा विश्वचषकाबाबत चाहत्यांमध्ये मोठी उत्सुकता आहे.
-
फिफा विश्वचषक २०२२ प्रथमच आखाती देशात आयोजित करण्यात येत आहे. यासाठी कतारने खूप खर्च केला आहे.
-
अर्जेंटिना, स्पेन, ब्राझील आणि इंग्लंड हे संघ यावेळी फिफा विश्वचषक ट्रॉफी जिंकण्याचे प्रबळ दावेदार आहेत.
-
त्याचबरोबर लिओनेल मेस्सी, ख्रिस्तियानो रोनाल्डो आणि नेमारसारख्या खेळाडूंसाठी हा शेवटचा विश्वचषक ठरू शकतो. म्हणूनच हे खेळाडू यावेळी खेळताना कोणतीही कसर सोडणार नाहीत.
-
फिफा विश्वचषक २०२२ चे विजेतेपद ब्राझीलने सर्वाधिक पाचवेळा जिंकले आहे.
-
कतार येथे होणाऱ्या विश्वचषक स्पर्धेत ३२ संघ सहभागी होत असून त्यांची चार-चारच्या गटात विभागणी करण्यात आली आहे.
-
गट फेरीतून एकूण १६ संघ उपांत्यपूर्व फेरीत पोहोचतील, त्यानंतर बाद फेरीचे सामने सुरू होतील.
-
स्पर्धेचा अंतिम सामना १८ डिसेंबर रोजी होणार आहे.
-
फिफा विश्वचषकाचा पहिला सामना कतार आणि इक्वेडोर यांच्यात झाला. या सामन्यात इक्वेडोरने यजमान संघाचा २-० असा दणदणीत पराभव केला आहे.
-
नेदरलँड्स आणि सेनेगलविरुद्धचे आगामी सामने जिंकून कतारला स्पर्धेत पुनरागमन करावे लागेल.
-
फिफा विश्वचषकाच्या इतिहासात पहिल्यांदाच यजमान संघाला सलामीच्या लढतीत पराभवाला सामोरे जावे लागले.
-
सर्व फोटो : Reuters/FIFA World Cup

Gudi Padwa 2025 : गुढीपाडव्यानिमित्त प्रियजनांना WhatsApp, Instagram, Facebook वर पाठवा ‘या’ खास मराठमोळ्या शुभेच्छा; पोस्ट करा सुंदर HD Images