-
काल म्हणजेच २० नोव्हेंबरपासून कतारमध्ये फिफा फुटबॉल विश्वचषकाला सुरुवात झाली आहे. मात्र याआधीच चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे.
-
कतारने वर्ल्ड कप सुरू होण्यापूर्वीच या स्पर्धेसाठी मद्य धोरण बदलले आहे. आता फुटबॉल स्टेडियमच्या आत दारू किंवा बिअरच्या विक्रीला परवानगी नसेल.
-
कतारमध्ये मद्य किंवा ड्रग्जच्या संदर्भात खूप कठोर नियम आहेत. मात्र फिफा विश्वचषक पाहण्यासाठी जगभरातून लोक येतात आणि त्या देशांमध्ये बिअर, दारू पिणे ही एक सामान्य गोष्ट आहे.
-
अशा परिस्थितीत, या बंदीपूर्वी, केवळ परवानाधारक रेस्टॉरंटमध्ये दारू उपलब्ध करून दिली जाईल, तसेच तयार केलेल्या नियमित फॅन झोनमध्ये दारू/बीअर उपलब्ध असेल अशी माहिती आयोजकांकडून देण्यात आली आहे.
-
आगामी फुटबॉल विश्वचषकात ड्रेस कोडबाबतही अनेक मोठे निर्णय घेण्यात आले आहेत.
-
कतारमधील एका सरकारी वेबसाइटने पर्यटकांना स्थानिक संस्कृतीचा आदर करण्यास सांगितले आहे. सर्व महिला चाहत्यांना त्यांचे खांदे आणि गुडघे झाकले जातील असे कपडे परिधान करण्यास सांगण्यात आले आहे.
-
त्याचबरोबर सार्वजनिक ठिकाणी लांब स्कर्ट किंवा पँट घालण्याच्या सूचनाही देण्यात आल्या आहेत.
-
याशिवाय पुरुषही संपूर्ण पाय झाकले जाणार नाहीत अशा जीन्स किंवा पँट घालू शकत नाहीत. याबरोबरच आक्षेपार्ह घोषणा असलेल्या कपड्यांवरही बंदी घालण्यात आली आहे.
-
कोणत्याही चाहत्याला पॉर्न पाहताना किंवा सेक्स टॉईजसह पकडले गेले तर त्याला मोठा दंड किंवा तुरुंगवासाची शिक्षा होऊ शकते. या गोष्टी कतारमध्ये नेण्यास परवानगी नाही.
-
तसेच, कतार हा इस्लामिक देश असल्याने येथे डुकराचे मांस खाण्यावर पूर्णपणे बंदी आहे.
-
कतारमध्ये फिफा विश्वचषक पाहायला येणाऱ्या चाहत्यांनी ते ज्या धर्माचे पालन करतात त्याच्याशी संबंधित कोणताही पवित्र ग्रंथ आपल्याबरोबर बाळगण्यास मनाई करण्यात आली आहे.
-
या देशामध्ये, विशेषतः स्पर्धेदरम्यान ई-सिगारेट आणि वेप्स यांचा वापर करण्यास परवानगी नाही. (सर्व फोटो : Pexels)

रीलसाठी थेट रेल्वे रुळावर झोपली! तेवढ्यात भरधाव वेगात ट्रेन आली अन्…, VIDEO पाहून बसेल धक्का