-
फिफा विश्वचषक २०२२ मधील तिसरा सामना आज २२ नोव्हेंबरला दुपारी ३.३० वाजता अर्जेंटिना विरुद्ध सौदी अरेबिया या संघांमध्ये खेळाला जाणार आहे.
-
मेस्सीने आपल्या कारकिर्दीत विश्वचषक ट्रॉफी वगळता सर्व काही मिळवले आहे.
-
मेस्सीला २०१४ मध्ये ही ट्रॉफी जिंकण्याची संधी मिळाली होती, परंतु अंतिम फेरीत जर्मनीने त्यांचा ०-१ असा पराभव केला होता.
-
अर्जेंटिनाने गेल्या वर्षी कोपा अमेरिकाचे विजेतेपद पटकावले होते आणि यावेळी हा संघ विश्वचषक ट्रॉफी जिंकण्याच्या दावेदारांपैकी एक आहे. सराव सामनाही अर्जेंटिना संघाने ५-० असा जिंकला.
-
२०१६ च्या कोपा अमेरिका फायनलमध्ये चिलीकडून झालेल्या पराभवानंतर मेस्सीने आंतरराष्ट्रीय फुटबॉलमधून निवृत्ती घेतली, परंतु नंतर त्याने आपला निर्णय बदलला आणि आजतागायत संघाचे नेतृत्व करत आहे.
-
यंदा सर्वांच्या नजरा मेस्सीवर असतील. अशा परिस्थितीत तो आपल्या देशासाठी ट्रॉफी जिंकण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करेल.
-
या विश्वचषक स्पर्धेत अर्जेंटिनाचा कर्णधार लिओनेल मेस्सी गोल्डन बूट घालून खेळताना दिसणार आहे.
-
मेस्सी आपला शेवटचा विश्वचषक खेळत असून ट्रॉफी जिंकण्यासाठी तो शक्य ते सर्व प्रयत्न करणार आहे.
-
मेस्सीचा संघ अर्जेंटिना सलग ३६ सामने हरलेला नाही. आता हे बूट मेस्सीला गोल करण्यात मदत करतील. एका कंपनीने मेस्सीसाठी हे बूट तयार केले आहेत.
-
मेस्सी आज सौदी अरेबियाविरुद्ध हे बूट घालूनच खेळणार आहे. अर्जेंटिनाच्या ध्वजात पांढऱ्या आणि निळ्या रंगांचा समावेश आहे आणि तो मेस्सीच्या बुटातही जोडला गेला आहे.
-
मेस्सीने ऑक्टोबरमध्ये जाहीर केले होते की त्याच्याकडे विश्वचषक ट्रॉफी जिंकण्याची ही शेवटची संधी आहे.
-
२००६ फिफा विश्वचषक स्पर्धेत मेस्सी पहिल्यांदा खेळला आणि हा त्याचा पाचवा विश्वचषक आहे.
-
फिफा विश्वचषक स्पर्धेत सर्वाधिक १९ सामने खेळण्याचा विक्रमही त्याच्या नावावर आहे.
-
तसेच, त्याने आपल्या देशासाठी सर्वाधिक सामने खेळले आहेत.
-
मेस्सीने अर्जेंटिनासाठी १६५ सामने खेळले असून ९१ गोल केले आहेत.
-
यंदा त्याला कतारहून ट्रॉफीसह मायदेशी परतायचे आहे.
-
सर्व फोटो : इन्स्टाग्राम
![Dhananjay Munde](https://www.loksatta.com/wp-content/uploads/2024/12/Dhananjay-Munde.jpg?w=300&h=200&crop=1)
Dhananjay Munde : संतोष देशमुख हत्याप्रकरणी धनंजय मुंडेंनी मौन सोडलं, वाल्मिक कराडविषयीही मांडली भूमिका!