-
एलजीबीटीक्यू समुदायाला पाठिंबा व्यक्त करण्यासाठी आणि सर्वसमावेशकतेचा पुकार करण्यासाठी सप्तरंगी पार्श्वभूमीवर हृदयाची आकृती आणि १ हा आकडा अशा प्रकारचे डिझाइन असलेल्या दंडपट्ट्या म्हणजे लैंगिक प्राधान्याबरोबरच वर्ण, वंश, धर्म आदि मुद्द्यांवर भेदाभेद असू नये, असे वनलव्ह आर्मबँडच्या मोहिमेचे उद्दिष्ट होते.
-
जर्मनीसह अनेक युरोपियन देशांच्या कर्णधारांनी आर्मबँड घालण्याचे वचन दिले एकमेकांना दिले होते. न्युअरने याविषयावर जोर देत सांगितले की जर अनेक राष्ट्रांनी हा आर्मबँड परिधान केला तर ते समलैगिक लोकांसाठीची शक्ती दर्शवणार होते. मात्र कतारमधील जाचक नियमांमुळे फिफाने कर्णधारांना पिवळे कार्ड देण्याची धमकी दिल्यानंतर त्यांनी हा निर्णय मागे घेतला.
-
जर्मनी आणि जपान यांच्यातील सामन्याआधी एक विचित्र गोष्ट पाहायला मिळाली. जपानविरुद्ध सामन्याला सुरुवात होण्याआधी जर्मनीच्या खेळाडूंनी आपल्या तोंडावर हात ठेवून फोटोसेशन केलं. जर्मन खेळाडूंची ही कृती लगेचच सोशल मीडियावर चांगलीच व्हायरल झाली आहे. या फोटोनंतर जर्मन खेळाडूंच्या कृतीमागचं कारण नेमकं काय असेल याची विचारणा होताना दिसत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, वनलव्ह आर्मबँड घालण्याच्या विरोधात फिफाने घेतलेल्या निर्णयाविरोधात जर्मन खेळाडूंनी तोंडावर हात ठेवत आपला निषेध व्यक्त केल्याचं कळतंय.
-
इंग्लंडच्या फुटबॉल संघाचा कर्णधार हॅरी केन या सामन्यात ‘वन लव्ह’ असा संदेश कोरलेला आर्मबँड घालून डेन्मार्क विरुद्धच्या सामन्यात खेळणार होता. पण इतर देशांच्या कर्णधारांनी आणि त्यांच्या खेळाडूंनी पिवळे कार्ड मिळण्याच्या भीतीने घातले नाही. म्हणून त्याला ही याची धास्ती वाटली आणि त्याने हा निर्णय मागे घेतला.
-
‘वन लव्ह’ आर्मबँडला परवानगी नसल्याचे सांगितल्यानंतर सहाय्यक रेफरीद्वारे जर्मन कर्णधार नेऊर चे आर्मबँड सामना चालू असताना तपासले गेले होते.
-
‘वन लव्ह’ आर्मबँडच्या डिझाइनमध्ये एलजीबीटीक्यूविषयी थेट उल्लेख नाही. परंतु कतारमध्ये समलैंगिकतेला कायदेशीर मान्यता नाही आणि याच्या समर्थनार्थ होणाऱ्या प्रतीकांना वा निषेध-निदर्शनांना स्वीकारले जात नाही. म्हणून यावर फिफाने बंदी घातली आहे.
-
क्रीडा मंत्रालयाचा देखील भार सांभाळत असलेल्या जर्मन गृहमंत्री नॅन्सी फेसर यांनी देखील आपल्या देशाच्या सामन्यासाठी स्टँडमध्ये “वन लव्ह” आर्मबँड घातला होता. नॅन्सी फेसर यांनी हॅशटॅगसह स्वतःचा तो परिधान केलेला फोटो पोस्ट केला आहे.
-
क्रीडा मंत्रालयाचा देखील भार सांभाळत असलेल्या जर्मन गृहमंत्री नॅन्सी फेसर यांनी परिधान केलेल्या “वन लव्ह” आर्मबँडला बऱ्याच जणांनी पाठिंबा दिला. त्यांच्या सोबत फिफाचे अध्यक्ष जियानी इन्फँटिनो याने देखील फोटो काढला आहे.
-
डीएफबीचे अध्यक्ष, Bernd Neuendorf म्हणाले, “माझ्या मते हे फिफाने केलेले शक्ती प्रदर्शन आहे. विश्वचषक स्पर्धेच्या इतिहासातील ही एक अभूतपूर्व घटना असण्याबरोबरच निराशाजनकही आहे.” ड्यूश टेलिकॉमने सांगितले की ते डीएफबीशी बोलण्याची योजना आखत आहेत, परंतु ते काय कारवाई करतील हे त्यांनी सांगितले नाही. डीएफबीचे इतर व्यावसायिक भागीदार फोक्सवॅगन, अदिदास, लुफ्थांसा आणि कॉमर्जबँक यांच्यावरही प्रतिक्रिया देण्याचा दबाव आहे.

लग्नानंतर अडीच वर्षांनी दिली गुडन्यूज! मराठी अभिनेत्रीच्या घरी पाळणा हलणार; डोहाळेजेवणाचे फोटो आले समोर