-
भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात संजू सॅमसनच्या जागी दीपक हुडा आणि शार्दुल ठाकूरच्या जागी दीपक चहरला संधी देण्यात आली होती.
-
कर्णधार धवन आणि संघ व्यवस्थापनाने संजू सॅमसनला दुसऱ्या एकदिवसीय सामन्यातून वगळल्याचे कळल्यानंतर चाहते संतापले होते आणि सोशल मीडियावर आपला राग काढत आहेत.
-
चाहते ऋषभ पंतऐवजी सॅमसनला संघात संधी देण्याचा सल्ला देत आहेत.
-
न्यूझीलंडविरुद्धच्या टी-२० मालिकेत देखील संजू सॅमसनला प्लेइंग इलेव्हनमध्ये संधी मिळाली नव्हती.
-
संजू सॅमसनने यावर्षी भारतीय संघासाठी एकदिवसीय सामन्यांच्या ९ डावात १४ षटकार ठोकले आहेत. सध्या २०२२ मध्ये वनडे फॉरमॅटमध्ये सर्वाधिक षटकार मारणारा तो देशाचा पहिला फलंदाज आहे.
-
सॅमसननंतर श्रेयस अय्यरचे नाव दुसऱ्या क्रमांकावर आहे. अय्यरने या वर्षात भारतीय संघासाठी १० षटकार लगावले आहेत.
-
युवा फलंदाज शुबमन गिल तिसऱ्या स्थानावर आहे. गिलने यावर्षी भारतीय संघासाठी १० डावात ९ षटकार लगावले आहेत.
-
युवा सलामीवीर इशान किशन चौथ्या स्थानावर आहे. किशनने टीम इंडियासाठी ६ डावांत ८ षटकार लगावले आहेत.
-
अष्टपैलू अक्षर पटेलचे नाव पाचव्या स्थानावर आहे. पटेलने यावर्षी भारतीय संघासाठी वनडेत ४ सामने खेळताना ६ षटकार लगावले आहेत. (सौजन्य-ट्विटर)

Chhaava: मकरंद अनासपुरे ‘छावा’ पाहिल्यावर म्हणाले, “इतिहासाची मोडतोड…”