-
भारताची स्टार धावपटू द्युती चंदने (Dutee Chand) सोशल मीडियावर काही फोटो शेअर केले आहेत. यानंतर तिचे चाहतेही गोंधळून गेले आहेत.
-
वास्तविक, द्युती चंद समलैंगिक आहे. यापूर्वी अनेकदा तिने हे मान्य केले आहे. यावेळी तिने त्याची गर्लफ्रेंड मोनालिसासोबतचे काही फोटो शेअर केले आहेत.
-
ओडिसाची रहिवासी असलेल्या द्युतीचा जन्म जिजापूर जिल्ह्यातील चाका गोपालपूर गावात झाला. तिने देशासाठी अनेक पदके जिंकली आहेत.
-
समलैंगिक संबंधांचा खुलासा झाल्यानंतर अॅथलीट द्युती चंदला तिच्याच गावात विरोधाचा सामना करावा लागला आहे. द्युती चंदचे कुटुंबही तिच्या निर्णयावर तिच्याबरोबर नाही.
-
व्हायरल होणाऱ्या या फोटोंमध्ये द्युती चंद सूट घातलेली दिसत आहे. तर तिची गर्लफ्रेंड मोनालिसाने लेहेंगा घातला आहे. दोघेही लग्नाच्या वेषात स्टेजवर वधू-वरासारखे खुर्चीवर बसलेले आहेत. हे फोटो बघून दोघांनी लग्न केल्याचे वाटते.
-
द्युती चंदने तिच्या इन्स्टाग्राम अकाउंटवरून हे फोटो शेअर केले आहेत. हे फोटो शेअर केल्यानंतर युजर्सनी पोस्टवर वेगवेगळ्या कमेंट्स केल्या आणि द्यूतीचे अभिनंदन करण्यास सुरुवात केली.
-
मात्र, या दोघांनी खरंच लग्न केलं आहे की कोना दुसऱ्याच्या लग्नात त्यांनी हा फोटो क्लिक केला आहे, याबाबत चाहत्यांमध्ये संभ्रम पाहायला मिळतोय.
-
द्यूतीचे इन्स्टाग्राम पाहिल्यावर लक्षात येते की काही दिवसांपूर्वीच तिच्या बहिणीचे लग्न झाले आहे. याच्याशी संबंधित फोटो तिने आपल्या इन्स्टाग्राम अकाउंटवर शेअर केले आहेत.
-
या फोटोंमध्ये द्युती आणि तिची जोडीदार सारखेच कपडे घातलेले दिसून आले. म्हणजेच हे द्युती चंदच्या लग्नाचे फोटो नसून तिच्या बहिणीच्या लग्नसोहळ्याचे फोटो असल्याचे स्पष्ट झाले आहे.
-
यादरम्यान द्युती आणि तिच्या जोडीदाराने एकत्र फोटो काढले होते. आता द्युतीने हे फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत.
-
तिच्या समलैंगिक संबंधाचा खुलासा झाल्यानंतर आणि घरच्यांच्या विरोधानंतर द्युती चंद म्हणाली होती की, ‘ते मला पुरुषाशी लग्न करून मुले जन्माला घालण्यास सांगत आहेत. त्यांना केवळ या परंपरेबद्दलच माहिती आहे.”
-
“पण मी ज्या शहरात शिकले, तिथे सगळे मला साथ देत आहेत. माझे कुटुंब आणि गाव मला साथ देईल की नाही हे मला माहीत नाही. हे पाहण्यासाठी मला खूप प्रतीक्षा करावी लागेल.” (सर्व फोटो : इन्स्टाग्राम)
Devendra Fadnavis : ‘मी शिंदेंना सांगणार, कडक समज द्या, अन्यथा…’, संजय गायकवाड यांच्या वक्तव्यावरून फडणवीसांचा मोठा इशारा