-
क्रिकेटमध्ये अनेक मोठे विक्रम आपल्या नावावर करणाऱ्या मिताली राजचा शनिवारी (३ डिसेंबर) ४० वा वाढदिवस आहे. क्रिकेटला अलविदा करणाऱ्या मितालीने २६ जून १९९९ रोजी तिच्या आंतरराष्ट्रीय क्रिकेट कारकिर्दीला सुरुवात केली. (सौजन्य-ट्विटर)
-
तिने आयर्लंडविरुद्ध एकदिवसीय पदार्पणात शतक (११४) झळकावले केले. त्यावेळी मिताली ही शतक झळकावणारी सर्वात तरुण खेळाडू होती. (सौजन्य-ट्विटर)
-
हा विक्रम तिच्या नावावर बराच काळ राहिला. तिने २००२ मध्ये इंग्लंडविरुद्ध कसोटी पदार्पण केले. (सौजन्य-ट्विटर)
-
मिताली राजला २००३ मध्ये अर्जुन आणि २०१५ मध्ये पद्मश्रीने सन्मानित करण्यात आले होते. द्विशतक (कसोटी २१४) झळकावणारी ती सर्वात तरुण क्रिकेटपटू आहे. (सौजन्य-ट्विटर)
-
१२ कसोटी, २३२ एकदिवसीय आणि ८९ टी-२० सामने खेळणाऱ्या मितालीने दीर्घकाळ भारतीय संघाचे नेतृत्व केले. तिच्या नेतृत्वाखाली संघाने २००५ आणि २०१७ एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेच्या अंतिम फेरीत प्रवेश केला होता. (सौजन्य-ट्विटर)
-
मिताली ही महिला आणि पुरुष संघाची एकमेव कर्णधार आहे, जिच्या नेतृत्वाखाली भारतीय संघ दोनदा एकदिवसीय विश्वचषक फायनल खेळला. मितालीने २०१७ मध्ये सलग ७ वेळा ५० पेक्षा जास्त धावांची इनिंग खेळली होती. (सौजन्य-ट्विटर)
-
१९८२ मध्ये जोधपूरमध्ये जन्मलेल्या मितालीला नृत्याची आवड होती. वयाच्या आठव्या वर्षी आपल्या भावाला क्रिकेट खेळताना पाहून तिने डान्स सोडला आणि या खेळाला आपली पहिली पसंती दिली. (सौजन्य-ट्विटर)
-
मितालीचे आवडते क्रिकेटर सचिन तेंडुलकर आणि ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार मायकल क्लार्क आहे. मितालीने आतापर्यंत लग्न केलेले नाही. (सौजन्य-ट्विटर)
-
जेव्हा तिला लग्नाबद्दल विचारले असता तिने सडेतोड उत्तर दिले. मितालीच्या म्हणण्यानुसार, ती तरुण असताना असे प्रश्न तिच्या मनात यायचे. (सौजन्य-ट्विटर)
-
लग्नाचा विचार पूर्वी यायचा, पण आता लग्न झालेल्यांना पाहून असा विचार येत नाही. ती म्हणाली मी लग्नाशिवाय आनंदी आहे. (सौजन्य-ट्विटर)
-
महिला क्रिकेटर म्हणून सर्वाधिक धावा करण्याचा विक्रमही मिताली राजच्या नावावर आहे. मितालीने तिन्ही फॉरमॅटच्या ३३३ सामन्यात १०८६९ धावा केल्या आहेत. (सौजन्य-ट्विटर)
-
मिताली राजच्या नावावर ८ शतके आणि ८५ अर्धशतके आहेत. (सौजन्य-ट्विटर)

मराठी बोलण्यास नकार दिल्यामुळं बेळगावमध्ये वाहकाला मारहाण; महाराष्ट्र-कर्नाटक बस सेवा बंद