-
भारत आणि बांगलादेश यांच्यातील वनडे मालिकेपूर्वी मोहम्मद शमी दुखापतीमुळे संपूर्ण मालिकेतून बाहेर पडला आहे. शमीची दुखापत हा भारतासाठी मोठा धक्का होता. (सौजन्य – ट्विटर)
-
कारण आता भारतीय संघात एकही वरिष्ठ वेगवान गोलंदाज नाही. ज्याचा फटका भारतीय संघाला दोन वनडे सामन्यात बसला आहे. (सौजन्य – ट्विटर)
-
जसप्रीत बुमराहच्या अनुपस्थितीत शमी भारतीय वेगवान आक्रमणाचे नेतृत्व करणार होता. परंतु सरावादरम्यान तो जखमी झाला. (सौजन्य – ट्विटर)
-
शमीने त्याच्यावर उपचार सुरू असतानाचा एक फोटो शेअर केला आहे. या फोटोमध्ये तो उजव्या खांद्यावर इंजेक्शन घेताना दिसत आहे. (सौजन्य – ट्विटर)
-
शमीच्या उजव्या खांद्याला दुखापत झाली. त्यामुळे त्याच्या भारतीय संघात उमरान मलिक खेळताना दिसत आहे. (सौजन्य – ट्विटर)
-
शमीला दुखापत झाल्यानंतर त्याच्या खांद्यावर उपचार सुरू आहेत. तो लवकरच तंदुरुस्त होईल अशी अपेक्षा आहे. (सौजन्य – ट्विटर)
-
दरम्यान, खांद्यावर उपचार करतानाचा एक फोटो त्याने शेअर केला होता. यासोबतच त्याने एक भावनिक कॅप्शनही लिहिले होते. (सौजन्य – ट्विटर)
-
32 वर्षीय शमी टी-20 विश्वचषक स्पर्धेत भारतीय संघाचा भाग होता. यानंतर त्याला न्यूझीलंड दौऱ्यावर विश्रांती देण्यात आली होती. (सौजन्य – ट्विटर)
-
भारतीय संघाने मोहम्मद शमीच्या गैरहजेरीत वनडे मालिका गमावली आहे. दोन्ही संघात १४ तारखेपासून पहिली कसोटी खेळवली जाणार आहे. (सौजन्य – ट्विटर)
५ मार्च राशिभविष्य: कृतिका नक्षत्रात १२ राशींच्या काम, खर्च व प्रेमाची स्थिती कशी असणार? पंचांगानुसार तुमच्या राशीचे भाग्य कसे उजळणार?