-
भारताने या सामन्यात पहिल्यांदा फलंदाजी करत ४०९ धावा केल्या. या सामन्यात ईशान किशन याने झंझावती द्विशतक झळकावले. त्याचबरोबर त्याने एका विश्वविक्रमाला गवसणी घातली आहे. किशन आपल्या पहिल्या शतकाचे रुपांतर द्विशतकात करणारा पहिला खेळाडू बनला आहे.
-
बांगलादेशविरुद्ध भारताकडून कोणत्याही विकेटसाठी इशान किशन आणि विराट कोहली यांनी सर्वाधिक धावांची भागीदारी केली आहे. #IshanKishan आणि #ViratKohli मधील भागीदारी भारतासाठी तिसरी सर्वोच्च आणि एकदिवसीय आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये सातव्या क्रमांकाची सर्वोच्च भागीदारी आहे.
-
सुंदर फटकेबाजीचा नजराणा पेश करत या दोघांनी चाहत्यांच्या डोळ्यांचं पारणं फेडलं. विशेष म्हणजे इशानने २०० धावा केल्यानंतर विराटनेच मैदानात भांगडा केल्याचं मजेदार दृष्य पहायला मिळालं. विराट कोहली आणि इशान किशनने २९० धावांची भागीदारी केली. या भागीदारीदरम्यान इशानने त्याचं द्विशतक आणि विराटने त्याचं ७२ वं शतकं साजरं केलं.
-
२४ वर्षीय इशान किशन हा सर्वात जलद द्विशतक झळकावणारा फलंदाज आहे. त्याने १२६ चेंडूत ही खेळी केली. यापूर्वी हा विक्रम ख्रिस गेलच्या नावावर होता. गेलने २४ फेब्रुवारी २०१५ रोजी झिम्बाब्वेविरुद्ध १३८ चेंडूत हा पराक्रम केला होता. त्याचवेळी, सेहवागने १४० चेंडूत इथपर्यंत मजल मारली.
-
दुहेरी शतक झळकावणारा इशान किशन हा सर्वात तरुण खेळाडू आहे. वयाच्या २४ वर्षे १४५ दिवसात त्याने हा पराक्रम केला. यापूर्वी कोणत्याही फलंदाजाला २५ धावांपेक्षा कमी धावा करताना द्विशतक गाठता आले नव्हते. रोहितने २६ वर्ष १८६ दिवसात ही कामगिरी केली. या बाबतीत ते दुसऱ्या क्रमांकावर आहेत.
-
दुहेरी शतक झळकावणारा ईशान हा जगातील ७वा फलंदाज आहे. सचिन, सेहवाग, रोहित, गेल, मार्टिन गप्टिल आणि पाकिस्तानच्या फखर जमान यांनी ही कामगिरी केली आहे. पण आपल्या पहिल्या शतकाचे द्विशतकात रूपांतर करणारा इशान हा पहिलाच फलंदाज आहे. त्याचा हा केवळ १०वा एकदिवसीय सामना आहे.
-
टीम इंडियाने पहिल्यांदाच प्रतिस्पर्धी संघाच्या घरी ४०० हून अधिक धावा केल्या आहेत. संघाला एकदिवसीय सामन्यात आतापर्यंत एवढी मोठी धावसंख्या उभारता आली नाही. या संघाने २०११ मध्ये वेस्ट इंडिजविरुद्ध सर्वाधिक ४१८ धावा केल्या होत्या. पण त्या भारतात केल्या होत्त्या.
-
८ वर्षांपूर्वी अजिंक्य रहाणे आणि विराट कोहली यांच्यात २१३ धावांच्या भागीदारीचा विक्रम होता पण या दोन्ही फलंदाजांनी हा विक्रम उद्ध्वस्त केला आहे. बांगलादेशविरुद्ध भारताकडून कोणत्याही विकेटसाठी इशान किशन आणि विराट कोहली यांनी सर्वाधिक धावांची भागीदारी केली आहे. #IshanKishan आणि #ViratKohli मधील भागीदारी भारतासाठी तिसरी सर्वोच्च आणि एकदिवसीय आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये सातव्या क्रमांकाची सर्वोच्च भागीदारी आहे.
-
भागीदारीच्या बाबतीत विराट- इशानने १९९८ मधील सौरव गांगुली व सचिन तेंडुलकर यांच्या श्रीलंकेविरुद्ध केलेल्या २५२ धावांची भागीदारीचा विक्रम मोडला. विराट व इशान यांनी १९० चेंडूंत २९० धावांची भागीदारी केली. संघातील स्थान पक्के करण्याची हिच ती वेळ… असे मनाशी ठाम करून इशानने बांगलादेशच्या गोलंदाजांची बिन पाण्याने धुलाई केली.
-
इशान किशनने १०३ चेंडूंत आज हा टप्पा ओलांडताना वीरेंद्र सेहवागचा २०११ साली ( ११२ चेंडू वि. वेस्ट इंडिज) नोंदवलेला विक्रम मोडला. रोहितने ११७ चेंडूंत ( वि. वेस्ट इंडिज, २०१८) व सचिन तेंडुलकर ११८ चेंडू ( वि. दक्षिण आफ्रिका, २०१०) चा सामना करताना हा विक्रम केला होता.
-
१००० हून अधिक दिवसांनंतर, एका भारतीय सलामीच्या फलंदाजाने एकदिवसीय क्रिकेटमध्ये शतक झळकावले. शेवटच्या वेळी जानेवारी २०२० मध्ये रोहित शर्माने ऑस्ट्रेलियाविरुद्ध शतक झळकावले होते.
-
बांगलादेशमध्ये सर्वात मोठी खेळी खेळणारा ईशान फलंदाज ठरला आहे. यापूर्वी हा विक्रम ऑस्ट्रेलियाचा माजी दिग्गज शेन वॉटसनच्या नावावर होता. त्याने २०११ मध्ये नाबाद १८५ धावांची खेळी केली होती. त्याचबरोबर विराट कोहलीनेही १८३ धावांची खेळी केली आहे.
-
कोणतेही शतक न करता थेट द्विशतक झळकावणारा युवा इशान किशन हा पहिलाच जगातील आणि भारतातील फलंदाज ठरला आहे. पहिल्या ३० षटकांत सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजांमध्ये इशानने १७९* धावांसह दुसरे स्थान पटकावले. या विक्रमात ऑस्ट्रेलियाचा माजी फलंदाज शेन वॉटसन ( १८५* वि. बांगलादेश, २०११) अव्वल स्थानी आहे. क्विंटन डी कॉकने २०१६मध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध १६६ धावा केल्या होत्या आणि त्याआधी हर्षल गिब्सने २००६मध्ये ऑसींविरुद्ध १५६ धावा चोपल्या होत्या.
-
पहिल्या द्विशतकानंतर दर २ वर्षांनी किमान एक द्विशतक झळकावले जात होते. पण यावेळी हे होण्यासाठी ४ वर्षे लागली. इशानपूर्वीचे शेवटचे द्विशतक फखर जमानने जुलै २०१८ मध्ये झिम्बाब्वेविरुद्ध झळकावले होते.
-
देशाबाहेर द्विशतक झळकावणारा ईशान पहिला भारतीय आहे. यापूर्वी सचिन तेंडुलकर, वीरेंद्र सेहवाग आणि रोहित शर्मा यांनी मिळून ५ द्विशतके भारतीय भूमीवर केली आहेत.

Chhaava: मकरंद अनासपुरे ‘छावा’ पाहिल्यावर म्हणाले, “इतिहासाची मोडतोड…”