-
आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये भारतीय संघाने (Team india) दमदार प्रदर्शन केले आहे.
-
भारतीय संघाने एकदिवसीय क्रिकेटमध्ये एकूण ६ वेळा ४०० च्या वर धावा केल्या आहेत.
-
भारतीय संघाने सर्वोच्च धावसंख्या २०११ मध्ये केली होती. चला तर जाणून घेऊया भारतीय संघाने कोणत्या संघासोबत ही विशेष कामगिरी केली आहे. पाहा संपूर्ण यादी.
-
भारत vs बर्म्युडा २००७: हा सामना एकदिवसीय विश्वचषकाचा सामना होता. ज्यात टीम इंडियाने बर्म्युडा विरुद्ध ४१३ धावा केल्या व २५७ धावांनी विजय मिळवला.
-
भारत vs श्रीलंका २००९: भारत आणि श्रीलंका यांच्यातील हा सामना खूपच रोमांचक होता. या सामन्यात टीम इंडियाने ४१४ धावा केल्या व विजय मिळवला.
-
भारत vs दक्षिण आफ्रिका २०१०: भारताने हा सामना १५३ धावांनी जिंकला आणि या सामन्यात टीम इंडियाने ४०१ धावा केल्या. या सामन्यात सचिन तेंडुलकरने नाबाद २०० धावा करून वनडे क्रिकेटच्या इतिहासातील पहिले द्विशतक झळकावले.
-
भारत vs वेस्टइंडीज २०११: या सामन्यात टीम इंडियाने ४१८ धावा केल्या. ही टीम इंडियाची वनडे क्रिकेटमधील सर्वोच्च धावसंख्या आहे. या सामन्यात वीरेंद्र सेहवागने २१९ धावांची खेळी केली. यात वेस्ट इंडिजला मोठ्या पराभवाला सामोरे जावे लागले.
-
भारत vs श्रीलंका २०१४: ऐतिहासिक ईडन गार्डन्सवर झालेल्या या सामन्यात भारताने श्रीलंकेचा १५३ धावांनी पराभव केला. टीम इंडियाने या सामन्यात ४०४ धावा केल्या. रोहित शर्माने एकदिवसीय क्रिकेटच्या इतिहासात सर्वाधिक २६४ धावा केल्या होत्या.
-
भारत vs बांगलादेश २०२२: भारत आणि बांगलादेश यांच्यात चट्टोग्राम येथे खेळल्या गेलेल्या एकदिवसीय सामन्यात भारताने ४०८ धावा केल्या. या सामन्यात इशान किशनने २१० आणि विराट ११३ धावा केल्या व विजय मिळवला. (फोटो सौजन्य-indian express)
Pune Bus Rape Case : पुणे बलात्कार प्रकरणातील आरोपी गाडेचा भाऊदेखील पोलिसांच्या ताब्यात; वकीलाने सांगितलं कारण