-
कतारमधील फुटबॉल विश्वचषक अंतिम टप्प्यात आला आहे. गतविजेता फ्रान्स आणि दोन वेळचा विजेता अर्जेंटिना यांनी अंतिम फेरी गाठली आहे. रविवारी (१८ डिसेंबर) लुसैल स्टेडियमवर या दोघांमधील विजेतेपदाचा सामना रंगणार आहे. पहिल्या उपांत्य फेरीत अर्जेंटिनाने क्रोएशियाचा ३-० असा पराभव केला तर दुसऱ्या उपांत्य फेरीत फ्रान्सने मोरोक्कोवर २-० अशी मात केली. आता दोन्ही संघ प्रथमच अंतिम फेरीत आमनेसामने असतील.
-
अर्जेंटिनाचा संघ रविवारी जेतेपदाच्या लढतीत उतरेल तेव्हा फ्रान्ससोबत स्कोअर सेट करण्याकडेही लक्ष असेल. गेल्या विश्वचषकात (२०१८), फ्रान्सने प्री-क्वार्टर फायनलमध्ये लिओनेल मेस्सीच्या संघाचा ४-३ असा पराभव करून स्पर्धेतून बाहेर फेकले होते. अर्जेंटिना तिसऱ्यांदा चॅम्पियन बनण्याकडे डोळे लावून बसला आहे. त्यांनी १९७८ आणि १९८६ मध्ये विजेतेपद पटकावले होते. त्याच वेळी, फ्रान्स १९९८ आणि २०१८ मध्ये चॅम्पियन बनला होता.
-
या विश्वचषकात लिओनेल मेस्सीच्या अर्जेंटिनाचा पहिला सामना सौदी अरेबियाविरुद्ध हरला. त्यानंतर त्याने पुनरागमन करून फायनलमध्ये धडक मारली. २०१० मध्ये स्पेनमध्येही असेच घडले होते. पहिल्या सामन्यात स्वित्झर्लंडविरुद्ध ०-१ असा पराभव पत्करावा लागला होता. त्यानंतर स्पेनने पुनरागमन करत जेतेपदावर कब्जा केला. पहिलाच सामना हरल्यानंतर चॅम्पियन बनवणारा पहिला संघ ठरला. आता अर्जेंटिनाला स्पेनसारखीच कामगिरी करण्याची संधी आहे.
-
पोलंडविरुद्धच्या तिसऱ्या गट फेरीच्या सामन्यात अर्जेंटिनाचा कर्णधार लिओनेल मेस्सीची पेनल्टी चुकली. यापूर्वी १९७८ आणि १९८६ मध्ये अर्जेंटिनाचा संघ चॅम्पियन झाला होता, तेव्हा तिसर्या सामन्यातच त्यांच्या खेळाडूंना पेनल्टीवर गोल करता आला नव्हता.
-
१९७८ मध्ये हंगेरीविरुद्धच्या तिसऱ्या सामन्यात अर्जेंटिनाच्या मारियो केम्पेसला पेनल्टीवर गोल करता आला नाही. त्यानंतर १९८६ मध्ये बल्गेरियाविरुद्धच्या गट फेरीतील तिसऱ्या सामन्यात दिएगो मॅराडोनाची पेनल्टी हुकली. आता तिसऱ्या सामन्यात पेनल्टी हुकल्याने अर्जेंटिनाचा संघ यावेळी चॅम्पियन होतो का हे पाहावे लागेल.
-
यावेळी मोरोक्कन संघाने त्यांच्या गट-एफमध्ये पहिले, बेल्जियम तिसरे आणि कॅनडा चौथे स्थान पटकावले. हे १९८६ मध्येही घडले होते. त्यानंतर मोरोक्कोने ग्रुप-एफमध्ये पहिले, बेल्जियमने ग्रुप-बीमध्ये तिसरे आणि कॅनडाने ग्रुप-सीमध्ये चौथे स्थान पटकावले. अर्जेंटिना १९८६ मध्ये चॅम्पियन बनला होता. आता या योगायोगाचा फायदा अर्जेंटिनाला मिळतो का, हे पाहावे लागेल.
-
रोनाल्डिन्हो नंतर फ्रांसच्या किलीयन एमबाप्पे याने २०१७ मध्ये पीएसजी क्लबमध्ये प्रवेश केला आणि २०१८ मध्ये फ्रांस विश्वविजेता ठरला. आता मेस्सीच्या बाबतीत असे घडताना दिसत आहे. त्याने २०२१ मध्ये पीएसजीशी करार केला आणि आता अर्जेंटिना अंतिम फेरीत पोहोचली.
-
मेस्सी विश्वचषकात सर्वाधिक गोल करणारा अर्जेंटिनाचा खेळाडू ठरला आहे. त्याने आतापर्यंत ११ गोल केले आहेत. यामुळे तो विश्वचषकात सार्वकालिन सर्वाधिक गोल करणाऱ्यांमध्ये आठव्या क्रमांकावर आहे. चालू विश्वचषकात त्याने ६ सामने खेळताना ५ गोल केले असून ३ असिस्टही केल्या आहेत.
-
अर्जेंटिनाचा कर्णधार लिओनेल मेस्सी सध्या क्लब स्तरावर फ्रान्समधील पॅरिस सेंट-जर्मेन संघाचा सदस्य आहे. तो २०२१ मध्ये संघाशी जोडला गेला होता. २००२ मध्ये चॅम्पियन बनलेला ब्राझीलचा स्टार खेळाडू रोनाल्डिन्हो पॅरिस सेंट-जर्मेनचा खेळाडू होता आणि २०१८ मध्ये विजेतेपद पटकावणारा फ्रेंच स्टार फुटबॉलपटू किलियन एमबाप्पे देखील पॅरिस सेंट-जर्मेनचा खेळाडू होता. आता २०२१ मध्ये क्लबमध्ये सामील झालेला मेस्सी २०२२ मध्ये चॅम्पियन बनू शकतो का हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.

लग्नानंतर अडीच वर्षांनी दिली गुडन्यूज! मराठी अभिनेत्रीच्या घरी पाळणा हलणार; डोहाळेजेवणाचे फोटो आले समोर