-
लुसेल स्टेडियममध्ये पार पडलेल्या फिफा विश्वचषक २०२२ च्या समारोप समारंभात जगभरातील अनेक कलाकारांनी सहभाग दर्शवला. यावेळी त्यांनी फिफा विश्वचषक स्पर्धेच्या अधिकृत साउंडट्रॅकमधील गाणी सादर केली. यामध्ये नायजेरियन गायक डेव्हिडो आणि कतारस्थित गीतकार आयशा, कॉंगोलीज कलाकार गिम्स आणि पोर्तो रिकन रेगेटन गायक ओझुना यांचा समावेश होता.
-
फ्रान्स आणि अर्जेंटिना यांच्यामध्ये खेळवला जाणारा सामना पाहण्यासाठी फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांनीही हजेरी लावले. यावेळी त्यांच्याबरोबर खेळाडू ज्लाटन इब्राहिमोविच इत्यादी मान्यवरही उपस्थित होते.
-
कतारमधील लुसेल येथील लुसेल स्टेडियमवर अर्जेंटिना आणि फ्रान्स यांच्यातील अंतिम सामना.
-
महिनाभर चाललेल्या या स्पर्धेसाठी संपूर्ण जग एकत्र आले होते. यावेळी आनंद साजरा करण्यासाठी फटाक्यांची आतिशबाजीही करण्यात आली.
-
कतारच्या लुसेल स्टेडियमवर अर्जेंटिना आणि फ्रान्स यांच्यात रंगलेला विश्वचषकाचा अंतिम सामना कोण जिंकणार हे पाहण्यासाठी सर्वच उत्सुक होते. या सामन्यातील काही खास क्षणांवर नजर मारूया.
-
अर्जेंटिना आणि फ्रान्स यांच्यातील विश्वचषक अंतिम फुटबॉल सामन्यादरम्यान फ्रान्सचा गोलकीपर ह्यूगो लॉरिस
-
लिओनेल मेस्सीने पेनल्टी स्पॉटवर गोल केला.
-
लिओनेल मेस्सी अंतिम फुटबॉल सामन्यात त्याच्या संघाचा सलामीचा गोल केल्यानंतर आनंद साजरा करत आहे.
-
सामन्यादरम्यान अर्जेंटिनाच्या एंजल डी मारियाने आपल्या संघासाठी दुसरा गोल नोंदवला.
-
एमबाप्पेने सलग दोन गोल करत संघासाठी शानदार पुनरागमन केले आहे. त्याने ८०व्या आणि नंतर ८१ व्या मिनिटाला गोल करून सामन्यात उत्साह वाढवला.
-
१०८व्या मिनिटाला लिओनेल मेस्सीने पुन्हा एकदा आपली जादू दाखवत संघासाठी तिसरा गोल करत अर्जेंटिना संघाला ३-२अशी आघाडी मिळवून दिली. ११८व्या मिनिटाला एमबाप्पेला पेनल्टी मिळाली, यावेळी त्याने पुन्हा गोल करत सामन्याची गुणसंख्या ३-३ अशी केली.
-
लिओनेल मेस्सी आणि लिएंड्रो परेडेस गोल केल्यानंतर आनंद साजरा करत आहेत.
-
पेनल्टी शूटआऊटमध्ये अर्जेंटिनाचा गोलकीपर एमिलियानो मार्टिनेझने फ्रान्सच्या किंग्सले कोमनचा गोल रोखल्यानंतर आनंद साजरा केला.
-
फ्रान्सचा पराभव केल्यानंतर अर्जेंटिनाच्या खेळाडूंनी आनंद साजरा केला.
-
लिओनेल मेस्सीने स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट खेळाडूचा गोल्डन बॉल पुरस्कार जिंकला. यानंतर फिफा विश्वचषक २०२२ ट्रॉफीचे चुंबन घेताना लिओनेल मेस्सी. (Photos: AP)
‘दारूचा नाद वाईट!’, स्वारगेट चौकात फिटनेसचे धडे गिरवतोय हा मद्यपी, पुण्यातील Video Viral