-
विश्वचषक अंतिम फेरीत गतविजेत्या फ्रान्सचा पराभव केल्यानंतर, अर्जेंटिनाने एकूण तिसऱ्यांदा आणि १९८६ नंतर प्रथमच विश्वचषक जिंकला. मंगळवारी संघाच्या खेळाडूंनी विजयाचा आनंद साजरा करण्यासाठी खुली बस मिरवणूक केली. त्यांचा संघ वर्ल्ड चॅम्पियन बनल्याबद्दल चाहते इतके उत्साहित झाले होते की सेलिब्रेशन कमी करावे लागले. (सौजन्य- Reuters)
-
अर्जेंटिनातील फिफा विश्वचषक विजय साजरा करताना. कर्णधार लिओनेल मेस्सीसह सर्व खेळाडू खुल्या बस मिरवणुकीचा भाग बनले. अर्जेंटिनाची राजधानी ब्युनोस आयर्समध्ये हजारो लोक जमून आपल्या संघाच्या विजयाचा आनंद साजरा करतात. अर्जेंटिनाच्या सरकारी एजन्सी टेलिमच्या म्हणण्यानुसार, ब्युनोस आयर्समधील स्मारकाच्या ठिकाणी लाखो लोक उपस्थित होते. (सौजन्य- Reuters)
-
जगज्जेता बनल्यानंतर महान कर्णधार लिओनेल मेस्सीचा संघ मायदेशी पोहोचला तेव्हा ५० लाख लोक त्याच्या स्वागतासाठी रस्त्यावर उतरले. संघाला खुल्या बसमध्ये विजयी मिरवणूक करावी लागली. सुमारे ११ किमीपर्यंत खचाखच भरलेल्या गर्दीत प्रवेश करताच लोकांनी टीम बसमधून उड्या मारायला सुरुवात केली. (सौजन्य- Reuters)
-
या विश्वचषकात मेस्सीची कामगिरी उत्कृष्ट राहिली आणि त्याने एकूण सात गोल केले. पोलंडविरुद्धच्या ग्रुप स्टेज मॅच वगळता मेस्सीने प्रत्येक मॅचमध्ये गोल केले. फ्रान्सविरुद्धच्या अंतिम सामन्यात मेस्सीने एकूण दोन गोल केले. तसेच त्याच्या विश्वचषकातील एकूण गोलांची संख्या १३ वर नेली. (सौजन्य- Reuters)
-
अर्जेंटिनाच्या ३६ वर्षांनंतर विश्वचषक जिंकल्याचा आनंद साजरा करण्यासाठी आणि त्यांच्या आवडत्या खेळाडूंची झलक पाहण्यासाठी लाखो लोक ब्युनोस आयर्सच्या रस्त्यावर उतरले, त्यामुळे वाहतूक कोंडी झाली आणि मिरवणूक थांबली. लोक झेंडे घेऊन आले होते. (सौजन्य- Reuters)
-
अर्जेंटिनाच्या खेळाडूंचे ब्युनोस आयर्समध्ये भव्य स्वागत करण्यात आले. विमानतळावर चाहते मोठ्या संख्येने उपस्थित होते. बस विजयी मिरवणुकीचा भाग म्हणून सर्व खेळाडू विमानतळावरून निघून गेले. सर्व खेळाडूंनी ट्रॉफीसह खुल्या बसमधून चाहत्यांना ट्रॉफी दाखवली. बसवर ‘चॅम्पियन्स ऑफ द वर्ल्ड’ असे लिहिले होते. (सौजन्य- Reuters)
-
विश्वचषक जिंकल्याची झलक पाहण्यास न मिळाल्याने अनेक चाहत्यांची निराशा जाहीर केली. संघाची एक झलक पाहण्यासाठी सकाळपासून वाट पाहत असलेले २५ वर्षीय डिएगो बेनाविडेझ म्हणाला, “विजयी संघासोबत विजयोत्सव व्यवस्थित करता यावा त्यासाठी सरकारने आयोजन करणे आवश्यक होते. (सौजन्य- Reuters)
-
विजयी संघाने हेलिकॉप्टरमधून राजधानीबाहेर अर्जेंटिना फुटबॉल असोसिएशनच्या मुख्यालयाकडे उड्डाण केले. त्यानंतरही काही चाहत्यांचा रस्त्यावर आनंदोत्सव सुरु होता. मोठ्या संख्येने चाहत्यांच्या आगमनामुळे सरकारची मजबुरी समजणारे अनेक जण होते आणि त्यामुळे ते उत्सवात मग्न झाले.३३ वर्षीय निकोलस लोपेझ जो आपल्या सात वर्षांच्या मुलीसह मिरवणुकीत आला होता. (सौजन्य- Reuters)
-
२५ वर्षीय डिएगो बेनाविडेझ म्हणाला, “विजयी संघासोबत विजयोत्सव व्यवस्थित करता यावा त्यासाठी सरकारने आयोजन करणे आवश्यक होते. सरकारला माहिती असायला हवे होते की जनता किती प्रमाणात रस्यांवर येणार आहे आणि कशापद्धतीने आपण यावर तोडगा काढून नियोजन होणे आवश्यक होते. हे सर्व झाले नाही म्हणून आम्ही संतापलो आहोत. त्यांनी आमच्याकडून विश्वचषकाची मजा हिरावून घेतली.” (सौजन्य- Reuters)
-
खेळाडूंना घेऊन जाणाऱ्या खुल्या बसमध्ये पुलावरून दोन जणांनी उडी मारल्याने मिरवणूक काही वेळातच थांबवण्यात आली. त्यातील एक बसच्या आत तर दुसरा फूटपाथवर पडला. फुटबॉल संघटनेचे प्रमुख क्लॉडिओ तापिया यांनी ढिसाळ नियोजनासाठी सरकारी यंत्रणेला जबाबदार धरले. (सौजन्य- Reuters)
-
अर्जेंटिनाच्या चाहत्यांसाठी हा विश्वचषक जिंकणे किती अर्थपूर्ण आहे? ते या छायाचित्र दिसते. ही विजयी मिरवणूक अनेक वर्षे स्मरणात राहील. मेस्सीने पाचव्या विश्वचषकात संघाला विजय मिळवून दिला. तसेच विश्वचषकातून युरोपचे १६ वर्षांचे वर्चस्व संपुष्टात आले. (सौजन्य- Reuters)
-
अर्जेंटिनाचे सर्व खेळाडू ट्रॉफीसह बसमध्ये चढून रॅलीमध्ये सामील झाले. अर्जेंटिना संघ चाहत्यांसह शहरात फिरत होता. ट्रॉफी घेऊन जाणाऱ्या बसच्या छतावर मेस्सीसह पाच खेळाडू बसले होते. त्यानंतर या खेळाडूंसमोर विजेची तार आली. सुरुवातीला कोणाच्याच लक्षात आले नाही, पण योग्य वेळी एका खेळाडूने ते पाहिले आणि सर्वांना सावध केले. (सौजन्य- Reuters)
-
अर्जेंटिना सरकारने विजयाचा आनंद साजरा करण्यासाठी सार्वजनिक सुट्टी जाहीर केली. दरम्यान, ब्यूनस आयर्समधूनही असे काही व्हिडिओ समोर आले आहेत ज्यात सेलिब्रेशनदरम्यान अपघात झाले आहेत. स्थानिक मीडिया रिपोर्ट्सनुसार, परिस्थिती नियंत्रणाबाहेर गेली आणि अर्जेंटिनाच्या खेळाडूंना हेलिकॉप्टरने बाहेर काढावे लागले. (सौजन्य- Reuters)
-
अर्जेंटिना सरकारने याला हवाई विजयी मिरवणूक म्हटले आहे. राष्ट्राध्यक्ष अल्बर्टो फर्नांडीझ यांच्या प्रवक्त्या गॅब्रिएला सेरुती यांनी सोशल मीडियावर लिहिले की, “जागतिक विजेते संपूर्ण मार्ग हेलिकॉप्टरने उड्डाण करत आहेत कारण मोठ्या संख्येने लोक येत असल्यामुळे रस्त्यावरून मिरवणूक सुरू ठेवणे अशक्य होते,” (सौजन्य- Reuters)
-
“चाहत्यांच्या गराड्यात खेळाडूंची सुरक्षा देखील तितकीच महत्वाची आहे. विजयी मिरवणुकीपेक्षा मेस्सी आणि त्याच्या संघातील खेळाडूंचा जीव अधिक मोलाचा आहे. त्यामुळे अशावेळी कुठलीही वाईट घटना घडू नये म्हणून आम्ही खबरदारी बाळगत त्यांना हेलिकॉप्टरमधून एअरलिफ्ट केले.” असे राष्ट्राध्यक्ष अल्बर्टो फर्नांडिस यांच्या प्रवक्त्या गॅब्रिएला सेरुती यांनी पुढे सोशल मीडियावर लिहिले आहे. (सौजन्य- Reuters)

शनीदेव घेऊन आले सुखाचे दिवस; मकर राशीची साडेसाती संपताच ‘या’ तीन राशींना गडगंज श्रीमंतीचे सुख लाभणार