-
यावेळी लिलावासाठी ९९१ क्रिकेटपटूंनी नोंदणी केली होती. पण अखेर ४०५ खेळाडूंची निवड करण्यात आली आहे. (फोटो-आयपीएल इन्स्टाग्राम)
-
या सर्वांवर सर्व १० फ्रँचायझी बोली लावतील. हा मिनी लिलाव भारतीय वेळेनुसार दुपारी 2.30 वाजता सुरू होईल. (फोटो-आयपीएल इन्स्टाग्राम)
-
दिल्ली कॅपिटल्स संघाकडे आयपीएल २०२३ च्या लिलावासाठी १९.४५ कोटी शिल्लक आहेत. तसेच या संघाने २० खेळाडूंना रिटेन केले आहे. (फोटो-आयपीएल इन्स्टाग्राम)
-
आयपीएलच्या पहिल्या सत्राचा विजेता राजस्थान रॉयल्स संघानेव आपल्या १६ खेळाडूंना रिटेन केले आहे. त्याचबरोबर संघाकडे १३.२ कोटी रुपये शिल्लक आहेत. (फोटो-आयपीएल इन्स्टाग्राम)
-
१५ व्या हंगामाचा विजेता गुजरात टायटन्स संघाने आपल्या १७ खेळाडू रिटेन केले आहेत. तसेच या संघाकडे लिलावापूर्वी १९.२५ कोटी रुपये शिल्लक आहेत. (फोटो-आयपीएल इन्स्टाग्राम)
-
गेल्या सत्रात आयपीएलमध्ये पदार्पण करणाऱ्या लखनौ सुपरजायंट्स संघाने आपल्या १५ खेळाडूंना रिटेने केले आहे. त्याचबरोबर संघाकडे २३.३५ कोटी रुपये रक्कम शिल्लक आहेत. (फोटो-आयपीएल इन्स्टाग्राम)
-
सनरायझर्स हैदराबद संघाने १३ खेळाडूंना आयपीएल २०२३ च्या हंगामासाठी रिटेन केले आहे. तसेच आयपीएलच्या लिलावाठी संघाकडे ४२.४५ कोटी शिल्लक आहे. (फोटो-आयपीएल इन्स्टाग्राम)
-
आयपीएल इतिहासात एकदाही ट्रॉफी जिंकू न शकलेला रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु संघाने १८ खेळाडूंना रिटेन केले आहे. या संघाकडे आयपीएल २०२३ लिलावासाठी ८.७५ कोटी शिल्लक आहेत. (फोटो-आयपीएल इन्स्टाग्राम)
-
कोलकाता नाईट रायडर्स संघाकडे आयपीएल २०२३ च्या लिलाव प्रक्रियेसाठी ७.०५ कोटी रुपये शिल्लक आहेत. त्याचबरोबर या संघाने लिलावापूर्वी १४ खेळाडूंना रिटेन केले आहे. (फोटो-आयपीएल इन्स्टाग्राम)
-
सर्वात जास्त वेळा आयपीएल फायनल खेळणाऱ्या चेन्नई सुपर किंग्ज संघाकडे आयपीएल २०२३ च्या लिलावासाठी २०.४५ कोटी रुपये शिल्लक आहेत. तसेच या संघाने रिटेन केलेल्या खेळाडूंची संख्या १८ आहे. (फोटो-आयपीएल इन्स्टाग्राम)
-
पंजाब किंग्स संघाने आयपीएल २०२३ च्या हंगामासाठी १६ खेळाडूंना रिटेन केले आहे. या संघाकडे लिलावासाठी ३२.२ कोटी शिल्लक आहेत. (फोटो-आयपीएल इन्स्टाग्राम)
-
आयपीएलमधील सर्वात यशस्वी संघ मुंबई इंडियन्सने आयपीएल २०२३ च्या हंगामासाठी १६ खेळाडूंना रिटेन केले आहे. त्याचबरोबर संघाकडे लिलावासाठी २०.५५ कोटी रुपये शिल्लक आहेत. (फोटो-आयपीएल इन्स्टाग्राम)

Champions Trophy: “हे फारच चुकीचं होतं…”, डेव्हिड मिलरने आफ्रिकेच्या पराभवाचं खापर ICCवर फोडलं, सामन्यानंतर दुबईला जाण्यावरून सुनावलं