-
आयपीएल २०२३ च्या लिलाव संपन्न झाला आहे. यंदा मिनी लिलाव कोची येथे झाला. यामध्ये ८७ स्लॉटसाठी ४०५ खेळाडू आपले नशीब आजमावले. (फोटो-ट्विटर)
-
आयपीएल २०२३ मिनी लिलाव आज कोची येते पार पडला. १० संघांमधये सर्वोत्कृष्ट खेळाडू निवडण्याची लढाई पाहिला मिळाली. (फोटो-ट्विटर)
-
इंग्लंडचा अष्टपैलू खेळाडू सॅम करन सर्वात महागडा खेळाडू ठरला. त्याला पंजाब किंग्सने १८.५० कोटी रुपयांना खरेदी केले. (फोटो-ट्विटर)
-
ऑस्ट्रेलियाचा कॅमरून ग्रीन सोळाव्या हंगामातील दुसरा सर्वात महागडा खेळाडू ठरला. मुंबई इंडियन्सने १७.५० कोटी बोली लावून त्याला आपल्या ताफ्यात सामील केले. (फोटो-ट्विटर)
-
इंग्लंडच्या कसोटी संघाचा कर्णधार आणि अष्टपैलू खेळाडू यंदाच्या लिलावातील तिसरा महागडा खेळाडू ठरला. त्याला चेन्नईने १६.२५ कोटीला खरेदी केले. (फोटो-ट्विटर)
-
कॅरेबियन स्फोटक अष्टपैलू निकोलस पूरनला देखील या लिलावात १६कोटीची बोली लागली. लखनौ सुपर जायंट्स संघाने त्याला आपल्या ताफ्यात सामील केले. (फोटो-ट्विटर)
-
इंग्लंडचा हॅरि ब्रूकसाठी सनरायजर्स आणि राजस्थान रॉयल्स मध्ये चढाओढ सुरु होती. परंतु सनरायजर्सने १३.२५ कोटी रुपयांना खरेदी केले. (फोटो-ट्विटर)
-
भारताचा युवा फलंदाज आणि पंजाबचा माजी कर्णधार मयंक अग्रवालसाठी सनरायजर्सने बोली जिंकली. त्याला ८.२५ कोटीमध्ये खरेदी करण्यात आले. (फोटो-ट्विटर)
-
गुजरात आणि राजस्थान मध्ये त्याच्यासाठी चढाओढ सुरु होती. त्याने तब्बल ६ कोटी कमावले शेवटी तो हार्दिक पांड्याच्या संघात सामील झाला. (फोटो-ट्विटर)
-
वेस्ट इंडिजचा अष्टपैलू खेळाडू जेसन होल्डने देखील चांगला भवा खाल्ला. त्याला राजस्थान रॉयल्स संघाने ५.२५ कोटींना खरेदी केले. (फोटो-ट्विटर)
-
मुकेश कुमारसाठी पंजाब आणि दिल्लीमध्ये रस्सीखेच सुरु होती. परंतु मूळ दिल्लीने त्याला ५ कोटी ५० लाख रुपयात विकत घेतले. (फोटो-ट्विटर)
-
दक्षिण आफ्रिकेचा हेन्री क्लासेनला ५.२५ कोटी रुपये मिळाले. त्याला काव्या मारनच्या हैदराबादने खरेदी केले. (फोटो-ट्विटर)

Highest Total in Champions Trophy: इंग्लंड संघाने घडवला इतिहास, चॅम्पियन्स ट्रॉफीच्या इतिहासातील उभारली सर्वात मोठी धावसंख्या