-
भारतीय क्रिकेट संघातील धडाकेबाज खेळाडू ऋषभ पंतच्या कारला भीषण अपघात झाला असून, यामध्ये ऋषभ पंत गंभीर जखमी झाला आहे. दिल्लीहून ऋषभ घरी येत असताना त्याच्या कारला हा भीषण अपघात झाल्याची माहिती समोर आली आहे.
-
रूरकीच्या नारसन सीमेवर हम्मदपुर झाल जवळील एका वळणावर ऋषभच्या कारचा अपघात झाला. यामध्ये ऋषभ गंभीर जखमी झाल्याने त्याला तातडीने देहरादून रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.
-
या भीषण अपघातीच माहिती मिळताच घटनास्थळी पोलीस दाखल झाले आणि खानपुरचे आमदार उमेश कुमार हेदेखील रुग्णालयात पोहचले आहेत.
-
डॉक्टरांनी दिलेल्या माहितीनुसार ऋषभ पंतच्या डोक्याला आणि पायाला गंभीर दुखापत झाली आहे. सध्या त्याची प्रकृती स्थिर असून, त्याच्यावर प्लास्टिक सर्जरी केली जाणार आहे.
-
अपघातस्थळी असलेल्या प्रत्यक्षदर्शींनी सांगितल्यानुसार, ऋषभची कार रेलिंगला धडकली, ज्यानंतर कारने पेट घेतला. मोठ्या प्रयत्नानंतर कारची आग विझवण्यात यश आलं.
-
२५ वर्षीय ऋषभ पंत उत्तराखंडमधील रूरकी येथील रहिवासी आहे. पंत आपली लग्जरी लाइफस्टाइलसाठी ओळखला जातो.
-
ऋषभचा २०२०-२१च्या GQ च्या सर्वांत प्रभावशाली तरुण भारतीयांच्या यादीतही समावेश झाला होता.
-
२०२१ साली त्याची एकूण संपत्ती ४७ कोटींच्या आसपास होती. मीडिया रिपोर्ट्सनुसार त्याची दिल्ली, रूरकी, हरिद्वार आणि डेहराडून येथे मालमत्ता आहे.
-
ऋषभ पंतला लग्जरी गाड्यांची आवड आहे. त्याने २०१७मध्ये ऑडी ए8 (Audi A8) खरेदी केली होती. या कारची किंमत जवळपास दीड कोटी रुपये आहे.
-
याशिवाय त्याच्याकडे मर्सडिज बेंज सी-क्लास (Mercedes-Benz C-class), फोर्ड मस्टॅंग, आणि मर्सडिज जीएलसी यासारख्या कार्सही आहेत.
-
अपघाताच्या वेळी ऋषभ मर्सडिज जीएलसीमधून प्रवास करत होता. ही एक प्रीमियम एसयूवी असून याची एक्स शोरूम किंमत ६१ लाखांच्या आसपास आहे, तर याच्या टॉप मॉडेलची किंमत ६७ लाखांपर्यंत जाऊ शकते.
-
एका मुलाखतीत ऋषभ पंत म्हणाला होता की i20 ही त्याची पहिली कार असावी ही त्याची मनापासून इच्छा होती. “माझ्याकडे १०० कोटी रुपये असले तरी मला माझी पहिली कार म्हणून i20 घ्यायची आहे”, असे तो म्हणाला होता.

Chhaava: मकरंद अनासपुरे ‘छावा’ पाहिल्यावर म्हणाले, “इतिहासाची मोडतोड…”