-
महान फुटबॉलपटूंपैकी एक असलेले ब्राझीलचे दिग्गज पेले यांचे वयाच्या ८२ व्या वर्षी निधन झाले. त्यांच्या निधनाच्या वृत्ताला त्यांच्या मुलीने गुरुवारी रात्री उशिरा इन्स्टाग्रामवर दुजोरा दिला. (फोटो सौजन्य-ट्विटर)
-
कोलन कॅन्सरशी झुंज देत असलेल्या ब्राझीलच्या माजी फुटबॉलपटूने केमोथेरपी उपचारांना प्रतिसाद देणे बंद केले होते. (फोटो सौजन्य-ट्विटर)
-
पेलेच्या उपस्थितीत ब्राझीलचा संघ ३ वेळा चॅम्पियन बनला. पेले यांनी १९५८, १९६२ आणि १९७० मध्ये विश्वचषक जिंकला होता. (फोटो सौजन्य-ट्विटर)
-
सर्वाधिक वेळा विश्वचषक जिंकण्याचा विक्रम पेलेंच्या नावावर आहे. एखाद्या खेळाडूसाठी त्याच्या करिअरमध्ये ३ वेळा वर्ल्ड चॅम्पियन बनणे सोपे नसते. (फोटो सौजन्य-ट्विटर)
-
पेलेंनी आपल्या कारकिर्दीत एकूण १२६३ सामन्यांमध्ये भाग घेतला आहे. या सामन्यांमध्ये त्यांचे एकूण १२८३ गोल आहेत. (फोटो सौजन्य-ट्विटर)
-
त्यांचे नाव गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंदवले गेले आहे. त्यांनी १९५९ आणि १९६१ मध्ये अनुक्रमे १२७ आणि ११० गोल केले होते. (फोटो सौजन्य-ट्विटर)
-
सर्वाधिक हॅटट्रिकचा विक्रमही पेलेंच्या नावावर आहे. पेलेंनी आपल्या कारकिर्दीत सर्वाधिक ९२ हॅट्ट्रिक्स केल्या आहेत. (फोटो सौजन्य-ट्विटर)
-
१९५८ च्या विश्वचषकात वयाच्या १७ वर्षे आणि २३९ दिवसांनी वेल्सविरुद्धच्या उपांत्यपूर्व फेरीत त्यांनी पहिला विश्वचषक गोल केला. अशाप्रकारे या स्पर्धेत गोल करणारा ते सर्वात तरुण फुटबॉलपटू ठरले. (फोटो सौजन्य-ट्विटर)
-
१९५८ च्या विश्वचषकाच्या उपांत्य फेरीत त्यांनी १७ वर्षे २४४ दिवस असताना फ्रान्सविरुद्ध हॅट्ट्रिक केली होती. (फोटो सौजन्य-ट्विटर)

शनीदेव घेऊन आले सुखाचे दिवस; मकर राशीची साडेसाती संपताच ‘या’ तीन राशींना गडगंज श्रीमंतीचे सुख लाभणार