-
भारतीय क्रिकेट संघाचा स्टार खेळाडू ऋषभ पंत ३० डिसेंबर रोजी एका रस्ता अपघातात गंभीर जखमी झाला होता.
-
त्याला डेहराडूनच्या मॅक्स हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले असून सध्या त्याच्यावर डॉक्टरांच्या देखरेखीखाली उपचार सुरू आहेत. या गंभीर दुखापतीमुळे ऋषभ पंतला काही काळ क्रिकेटपासून दूर राहावे लागणार आहे.
-
दरम्यान, ऋषभ पंत पुन्हा संघात कधी सामील होणार हे येणारा काळच सांगेल. पण असे अनेक क्रिकेटपटू आहेत जे अपघाताला बळी पडल्यानंतरही संघात परतले आणि देशासाठी धडाकेबाज खेळले. चला अशा नावांवर एक नजर टाकूया.
-
नवाब मन्सूर अली खान पतौडी यांनी वयाच्या २०व्या वर्षी, एका कार अपघातात त्यांचा एक डोळा गमावला. असे असतानाही ते संघात परतले आणि देशासाठी जिद्दीने खेळले. (Photo: ESPN)
-
मोहम्मद शमी देखील २०१८ मध्ये कार अपघातात जखमी झाला होता. दुखापतीतून सावरल्यानंतर शमीने शानदार पुनरागमन केले. (Photo: Social Media)
-
टीम इंडियाचा भाग असलेले साईराज बहुतुलेनींही कार अपघातात जखमी झाल्यानंतरही संघात दमदार पुनरागमन केले. (Photo: BCCI)
-
त्या अपघातानंतर बहुतुले यांच्या पायात रॉड बसवावा लागला. त्यानंतर बहुले यांना वर्षभर मैदानाबाहेर राहावे लागले होते. (Indian Express)
-
ऑगस्ट २००३ मध्ये एक कार अपघातात श्रीलंकेच्या कौशल लोकुराचीच्या खांद्याला दुखापत झाली. या अपघातात एका महिलेचाही मृत्यू झाला होता. (Photo: ESPN)
-
अनेक महिने खेळापासून दूर राहिल्यानंतर कौशलने जोरदार पुनरागमन केले आणि देशासाठी अनेक सामने खेळले. (Photo: ESPN)

Pune Bus Rape Case : पुणे बलात्कार प्रकरणातील आरोपी गाडेचा भाऊदेखील पोलिसांच्या ताब्यात; वकीलाने सांगितलं कारण