-
२०१६ मध्ये आंतरराष्ट्रीय पदार्पण केल्यापासून, जसप्रीत बुमराहने भारतासाठी ३० कसोटी, ७२ एकदिवसीय आणि ६० टी-२० आंतरराष्ट्रीय सामने खेळले आहेत. परंतु त्याच्या पदार्पणाच्या दोन वर्षानंतरच, तो जवळजवळ दरवर्षी जखमी होऊ लागला आहे. (फोटो सौजन्य – ट्विटर)
-
माजी दिग्गज वेगवान गोलंदाज मायकेल होल्डिंगसह अनेक तज्ञांचे एक मत मांडले आहे. बुमराह खूप कमी धाव घेतअसतानाही वेगवान गोलंदाजी करतो, त्यामुळे दुखापत होण्याची शक्यता असते. (फोटो सौजन्य – ट्विटर)
-
भारत २०१८ मध्ये आयर्लंड आणि इंग्लंड दौऱ्यावर होता. जसप्रीत बुमराहच्या तीन-चार महिन्यांच्या प्रदीर्घ दौऱ्याच्या पहिल्याच दिवशी आयर्लंडविरुद्धच्या टी-२० सामन्यात झेल घेण्याच्या प्रयत्नात जखमी झाला. (फोटो सौजन्य – ट्विटर)
-
त्यानंततर एक्स-रे मध्ये त्याच्या अंगठ्याला फ्रॅक्चर झाल्याचे दिसून आले. या दुखापतीमुळे तो ३ आठवडे मैदानाबाहेर होता. (फोटो सौजन्य – ट्विटर)
-
त्याने २०१९ दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या घरच्या मालिकेतून आपले नाव मागे घेतले होते. नंतर स्कॅनमध्ये असे दिसून आले की त्याच्या पाठीच्या खालच्या भागात ताण फ्रॅक्चर आहे, ज्यासाठी त्याला उपचारांसाठी यूकेला जावे लागेल. यादरम्यान बुमराह जवळपास ३ महिने बाहेर राहिला. (फोटो सौजन्य – ट्विटर)
-
जानेवारी २०२१ मध्ये सिडनी येथे ऑस्ट्रेलियाविरुद्ध कसोटी सामन्यात क्षेत्ररक्षण करताना बुमराहच्या पोटाचे स्नायू ताणले गेले. यानंतर काही दिवसांच्या अनिश्चिततेनंतर तो उर्वरित मालिकेतून बाहेर पडला. (फोटो सौजन्य – ट्विटर)
-
२५ सप्टेंबर २०२२ रोजी त्याने शेवटचा सामना खेळला आणि त्यानंतर उर्वरित वर्षभर तो मैदानाबाहेर राहिला. ऑगस्टमध्ये ब्रेक दरम्यान बुमराहच्या पाठीला दुखापत झाली होती. तो आता श्रीलंकेविरुद्धच्या वनडे मालिकेतून पुनरागमन करणार आहे. (फोटो सौजन्य – ट्विटर)
-
यावर्षी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप फायनल, आशिया कप आणि एकदिवसीय वर्ल्ड कप २०२३ खेळले जाणार आहेत. अशा परिस्थितीत बुमराहसाठी या मोठ्या स्पर्धांमध्ये तंदुरुस्त राहणे खूप महत्त्वाचे आहे. (फोटो सौजन्य – ट्विटर)
-
कारण गेल्या वर्षी आशिया चषक आणि टी-२० विश्वचषक व्यतिरिक्त, भारताच्या परदेश दौऱ्यांवर त्याची अनुपस्थिती स्पष्टपणे दिसून आली आहे. (फोटो सौजन्य – ट्विटर)

“बलुचिस्तानच्या जन्माची वेळ…”, निवृत्त मेजर जनरल बक्षी यांचं सूचक वक्तव्य; म्हणाले, “स्थिती पाकिस्तानच्या नियंत्रणाबाहेर”