-
तीन एकदिवसीय मालिकेतील पहिल्या सामन्यात भारताने श्रीलंकेचा ६७ धावांनी पराभव केला. या विजयासह टीम इंडियाने मालिकेत १-० अशी आघाडी घेतली आहे. विराट कोहलीने आज एकदिवसीय क्रिकेटमधील ४५ वे शतक झळकावताना महान फलंदाज सचिन तेंडुलकरचे विक्रम मोडले. विराटने ८७ चेंडूंत १२ चौकार व १ षटकारांसह ११३ धावा केल्या. विराटचे सोडलेले दोन झेल श्रीलंकेला महागात पडले.
-
भारत-श्रीलंका यांच्यातील मंगळवारी (१० जानेवारी) गुवाहाटीमध्ये झालेल्या सामन्यादरम्यान एक रंजक घटना पाहायला मिळाली, ज्यामुळे टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्माचे कौतुक केले जात होते. लोक त्याच्या खेळाने खूप प्रभावित झाले आहेत. अंपायर यांनी तिसऱ्या अंपायरचा सिग्नल दिला, परंतु रोहित पळत आला अन् अपील मागे घेतले.
-
शुबमन आणि रोहित शर्मा यांनी १४३ धावांची सलामी दिली. शुभमन ६० चेंडूंत ११ चौकारांच्या मदतीने ७० धावांवर, तर रोहित ६७ चेंडूंत ९ चौकार व ३ षटकारांसह ८३ धावांवर माघारी परतला. सचिनने एकदिवसीय क्रिकेटमध्ये ४५ शतकांसाठी ४२४ इनिंग्ज खेळल्या, विराटने २५७ इनिंग्जमध्ये हा पराक्रम केला. भारताने ७ बाद ३७३ धावांचा डोंगर उभा केला.
-
श्रीलंकेच्या डावातील शेवटच्या षटकातील आहे. तिसरा चेंडू टाकण्यापूर्वी मोहम्मद शमीने नॉन-स्ट्रायकर एंडला दासुन शनाकाला धावबाद केले. अंपायर नितीन मेनन यांनी ते थर्ड अंपायरकडे पाठवले. त्यानंतर रोहित शर्माने मोहम्मद शमीशी बोलून अपील मागे घेण्यास सांगितले.
-
शनाका त्यावेळी शतकापासून अवघ्या दोन धावा दूर होता. शमीने शनाकाच्या विकेटसाठी अंपायरकडे अपील केली, पण तितक्यात कर्णधार रोहित शर्मा याने शमीला अपील मागे घेण्यास सांगितले. रोहितच्या या निर्णयावर चाहत्यांकडून समिश्र प्रतिक्रिया येत आहेत. काहींच्या मते रोहितचा निर्णय बरोबर होता, तर काहींच्या मते रोहितने शमीला अपील मागे घेण्यास सांगणे, चुकीचे होते.
-
श्रीलंकेच्या अनेक माजी दिग्गज खेळाडूंकडून कौतुकाचा वर्षाव होत आहे. त्यात धडाकेबाज फलंदाज सनथ जयसूर्या, अट्टापट्टू यांनी कौतुक केले. अँजेलो मॅथ्यूजने ट्विटच्या माध्यमातून म्हटले, “बरेच कर्णधार असे करतील पण रोहित शर्माने मनं जिंकली.
-
अपील मागे घेतल्याबद्दल @ImRo45 ला सलाम! चांगल्या खिलाडूवृत्तीचे प्रदर्शन.” तर सनथ जयसूर्या यांनी देखील हिटमॅनच्या निर्णयाला दाद दिली. “रोहित शर्माने धावबाद करण्यास दिलेला नकार आणि दाखवलेली खिलाडीवृत्ती त्यामुळे तो खरा विजेता होता”, असे जयसूर्या यांनी म्हटले.”
-
शमीने दासुन शनाकाला धावबाद केले तेव्हा तो ९८ धावांवर खेळत होता. रोहित शर्माच्या माध्यमातून अपील मागे घेतल्यानंतर शनाकानेही आपले शतक पूर्ण केले. विस्डेन इंडियाच्या वृत्तानुसार, रोहित शर्मा म्हणाला, “मला माहित नव्हते की शमीने असे केले आहे, तो ९८ धावांवर खेळत होता, आम्ही त्याला अशा प्रकारे बाहेर काढू शकत नाही, आम्हाला त्याने जसे केले तसे बाहेर काढायचे होते.”
-
श्रीलंकेचा संघ ५० षटकांत ८ गडी गमावून ३०६ धावाच करू शकला. एके काळी १७९ धावांवर श्रीलंकेने ७ विकेट्स गमावल्या होत्या आणि मोठ्या पराभवाचा धोका होता, पण त्यानंतर कर्णधार दासुन शनाकाने खूप झुंज देत संघाला ३०० धावांच्या जवळ आणले. शनाकाने १०८ धावांची सुंदर खेळी खेळली. हे त्याचे एकदिवसीय कारकिर्दीतील दुसरे शतक होते.

डोंबिवलीत ‘हे’ चाललंय काय? भर दुपारी लोकलमध्ये तरुणानं नशेत काय केलं पाहा; VIDEO पाहून धडकी भरेल