-
पृथ्वी शॉला त्याच्या चांगल्या कामगिरीचे बक्षीस मिळाले आणि तो टीम इंडियामध्ये आपले स्थान पुन्हा मिळवण्यात यशस्वी झाला आहे. अलीकडेच त्याने रणजी ट्रॉफीमध्ये आसामविरुद्ध ३७९ धावांची उत्कृष्ट खेळी खेळली होती. (फोटो-सौजन्य ट्विटर)
-
प्रथम श्रेणी स्पर्धेतील भारतीय फलंदाजाने केलेली ही दुसरी सर्वोत्तम धावसंख्या आहे. यानंतर सुनील गावस्करपासून अनेक बड्या व्यक्ती त्याच्या कामगिरीचे कौतुक केले आहेत. (फोटो-सौजन्य ट्विटर)
-
मॉडेल आणि अभिनेत्री निधी तापडीने तिचा फोटो सोशल मीडियावर टाकला आणि लिहिले, प्रेमाने मित्र मला लैला म्हणतात. यावर पृथ्वी शॉने कमेंटकरताना लिहिले होते की, हे मित्र कोण आहेत. (फोटो-सौजन्य इंस्टाग्राम)
-
यासोबत त्याने एक इमोजीही शेअर केला आहे. यावर निधीने प्रत्युत्तर देत उत्तर दिले की, जे रिप्लाय देत आहेत ते. तेव्हापासून नेटिझन्स या दोघांच्या नात्याबद्दल बरीच चर्चा करत आहेत. (फोटो-सौजन्य इंस्टाग्राम)
-
याआधी नवीन वर्षातही दोघांचे एकत्र फोटो सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल झाले होते. निधी लोकप्रिय टीव्ही शो सीआयडीमध्येही दिसली आहे. (फोटो-सौजन्य इंस्टाग्राम)
-
न्यूझीलंडविरुद्धच्या टी-२० मालिकेसाठी शॉचा भारतीय संघात समावेश करण्यात आला आहे. दरम्यान, मिस्ट्री गर्लवर शॉने केलेली एक कमेंट सोशल मीडियावर चांगलीच व्हायरल होत आहे. (फोटो-सौजन्य इंस्टाग्राम)
-
२३ वर्षीय पृथ्वी शॉने जुलै २०२१ मध्ये टीम इंडियासाठी शेवटचा सामना खेळला होता. न्यूझीलंडविरुद्धच्या टी-२० मालिकेत त्याला पुन्हा एकदा आपली छाप सोडायची संधी मिळाली आहे. (फोटो-सौजन्य इंस्टाग्राम)
-
याआधी पृथ्वी आणि ऋचा सिंग यांच्यात डेट झाल्याच्या बातम्या आल्या होत्या, मात्र नंतर त्यांचे ब्रेकअप झाले. पृथ्वी सध्या मुंबईसाठी चांगली कामगिरी करून टीम इंडियात पुनरागमन केले आहे. (फोटो-सौजन्य ट्विटर)
-
जेव्हा पृथ्वी शॉने विक्रमी त्रिशतक झळकावले होते, तेव्हा देखील निधी तापडीने पृथ्वीसाठी इंस्टा स्टोरी ठेवली होती. (फोटो-सौजन्य इंस्टाग्राम)

७ मार्च राशिभविष्य: दुर्गाष्टमीला ‘या’ राशींना धनलाभ तर कोणाला वैवाहिक सुख-शांती जपावी लागणार? तुम्हाला माता लक्ष्मीची अपार कृपा लाभणार का?