-
टीम इंडियाने विश्वचषक २०२३च्या दृष्टीकोनातून श्रीलंकेविरुद्धच्या मालिकेतून विजयी सुरुवात केली आहे. भारताने तीन सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेत ३-० असा व्हाईटवॉश देत लंका दहन केले.
-
कर्णधार रोहित शर्माचा विश्वास शुबमन गिलने सार्थ ठरवत शानदार शतकं झळकावले. दोन्ही संघाच्या अंतिम अकरामध्ये दोन बदल करण्यात आले होते. या सामन्यात सलामीवीर शुबमन गिलने धडाकेबाज शतक झळकावत संघातील आपली दावेदारी पक्की केली आहे. यामुळे द्विशतकवीर इशान किशनचे संघातील स्थान धोक्यात आले आहे.
-
जेव्हाही जगातील दिग्गज खेळाडूंच्या विक्रमांची चर्चा होते, त्यामध्ये विराट कोहली आणि सचिन तेंडुलकर ही दोन भारतीय नावे आवर्जुन घेतली जातात. विशेष म्हणजे, आंतरराष्ट्रीय स्तरावर सर्वाधिक शतके करणाऱ्या अव्वल दोन स्थानी अनुक्रमे सचिन (१००) आणि विराट (७४) ही दोन नावे आहेत. विराट ज्या वेगाने शतकांचा पाऊस पाडत आहे, ते पाहून तो लवकरच सचिनच्या शतकांच्या शतकाचा विक्रम लवकरच मोडेल, असा सूर चाहत्यांमध्ये आहे.
-
कर्णधार रोहित शर्मा दुखापतीनंतर खूप दिवसांनी मैदानात उतरला होता. जरी त्याने शतकी खेळी केली नसली तर देखील गुवाहाटीमधील पहिल्या आणि आजच्या तिरुअनंतपुरम मधील सामन्यात शुबमन गिलसोबत मोठी सलामी भागीदारी करण्यात मोठा वाटा निभावला होता. पहिल्या सामन्यात ८९ आणि आजच्या सामन्यात ४३ धावा केल्या. यातून सलामीला रोहित असणार हे नक्की झाले आहे.
-
तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात भारतीय संघाचा माजी कर्णधार विराट कोहली याने दीडशतक ठोकले. विराटने यादरम्यान ११० चेंडूत ८ षटकार आणि १३ चौकारांच्या मदतीने नाबाद १६६ धावांचा पाऊस पाडला. विराटने यावेळी शतक झळकावण्यासाठी ८५ चेंडूचा सामना केला होता. यात त्याने सर्वाधिक एका सामन्यात षटकार मारण्याचा त्याचाच विक्रम देखील मोडला. आधी त्याने ७ षटकार मारले होते आज त्याने ८ षटकार मारले आणि दुसऱ्या क्रमांकाची त्याची सर्वोच्च धावसंख्या केली.
-
मधल्या फळीतील विराट कोहलीसोबत चौथ्या क्रमांकावर येणारा श्रेयस अय्यरच्या रूपाने प्रश्न सोडवला आहे असे आताच म्हणता येणार नाही. कारण ४०,३८, ३९ अशी धावा करून नेहमी बाद होतो. अर्धशतक आणि शतक जर त्याने मारले तरच त्याचे संघातील स्थान निश्चित होऊ शकते.
-
एकदिवसीय फॉरमॅटमध्ये पदार्पण केल्यापासून संघासाठी चमकदार कामगिरी करत आला आहे. कारकिर्दीतील या १८व्या वनडे सामन्यात गिलने मोठी विक्रम नावावर केला. सामन्यातील ११६ धावांच्या जोरावर गिलची वनडे फॉरमॅटमधील एकंदरीत धावसंख्या ८९४ झाली. कारकिर्दीतील पहिल्या १८ एकदिवसीय डावांमध्ये सर्वाधिक धावा करणाऱ्यांच्या यादीत गिल आता तिसऱ्या क्रमांकावर पोहोचला आहे.
-
कुलदीप यादवने देखील त्याचा जलवा दाखवत ईडन गार्डन येथील कोलकाता मध्ये झालेल्या दुसऱ्या सामन्यात ५ गडी बाद करत मधल्या षटकातील चिंता मिटवली आहे. मात्र युजवेंद्र चहल आणि कुलदीप यादव यांच्यापैकी एकालाच संघात स्थान मिळू शकते. कारण ७व्या आणि ८व्या क्रमांकावर भारताला अष्टपैलू खेळाडूची गरज आहे. पण रिस्ट स्पिनर हे नेहमी संघात उपयोगाचे असतात.
-
उमरान मलिकच्या रूपाने टीम इंडियाला जसप्रीत बुमराहची जागा भरून काढणारा वेगवान गोलंदाज मिळाला आहे असे म्हटले तर वावगं ठरणार नाही. त्याने वेळोवेळी संघाला गरज असेल त्यावेळेस विकेट काढून दिली आहे. मात्र त्याला धावा देणे आणि इकोनॉमिकली अधिक चांगली कामगिरी करावी लागेल तरच त्याचा विश्वचषकासाठी समावेश होऊ शकतो.

Chhaava: मकरंद अनासपुरे ‘छावा’ पाहिल्यावर म्हणाले, “इतिहासाची मोडतोड…”