-
भारताची टेनिस स्टार सानिया मिर्झाने टेनिसला रामराम केला आहे. प्रोफेशनल टेनिसमधून आपण निवृत्त होतो आहोत असा आशय असलेली एक पोस्ट सोशल मीडियावर सानिया मिर्झाने लिहिली आहे. सोशल मीडियावर सध्या तिच्या भावूक पोस्टची चर्चा आहे.
-
सानिया मिर्झा दुहेरी टेनिस स्पर्धेत ३ वेळा चॅम्पियन ठरली आहे. यामध्ये २०१६ मध्ये ऑस्ट्रेलियन ओपनचं महिला दुहेरीचे विजेतेपद तिने पटकावलं. सानिया मिर्झाने महिला दुहेरीत २०१५ मध्ये विम्बल्डन आणि यूएस ओपनचे विजेतेपद मिळवलं.
-
टेनिसच्या कारकिर्दीत ग्रँड स्लॅम एकेरीत सानियाला विजेतेपद मिळवता आलं नाही. मात्र एकेरीशिवाय तिने ऑस्ट्रेलियन ओपन, फ्रेंच ओपन आणि यू. एस. ओपन दुहेरी तसंच मिश्र दुहेरीत विजेतेपद मिळवलं आहे.
-
ऑस्ट्रेलिया ओपन २०२३ हे आपले शेवटचे ग्रँडस्लॅम असेल असे सानियाने यापूर्वीच सांगितले होते.
-
तसंच ऑस्ट्रेलियन ओपननंतर सानिया दुबईत होणाऱ्या टेनिस चॅम्पियनशिपमध्ये भाग घेईल ही तिची शेवटची स्पर्धा असणार आहे. दुबईतल्या या स्पर्धेनंतर सानिया प्रोफेशनल टेनिसला अलविदा करणार आहे.
-
ऑस्ट्रेलियन ओपनला सुरुवात झाली आहे. संपूर्ण जगाच्या नजरा राफेल नदाल, नोव्हाक जोकोविचवर आहेत. यावेळी नदाल आपल्या विजेतेपदाचे रक्षण करेल, तर जोकोविच या ग्रँडस्लॅममध्ये पुनरागमन करण्यास सज्ज असेल. कोविड लसीकरणामुळे गेल्या वर्षी जोकोविचला ऑस्ट्रेलियातून परत पाठवण्यात आले होते.
-
या दोघांशिवाय संपूर्ण जगाच्या नजरा भारताची दिग्गज टेनिसपटू सानिया मिर्झावर असणार आहेत. कारण हे सानियाचे शेवटचे ग्रँडस्लॅम असणार आहे.
-
माजी जागतिक नंबर वन महिला दुहेरी खेळाडू सानिया आपला शेवटचा ग्रँडस्लॅम खेळण्यासाठी कोर्टवर उतरणार आहे. यावेळी अॅना डॅनिलिना तिची जोडीदार आहे.
-
सानियाने यापूर्वीच जाहीर केले होते की तिची शेवटची मोठी स्पर्धा ऑस्ट्रेलियन ओपन असेल आणि ती पुढील महिन्यात दुबईत तिच्या कारकिर्दीतील शेवटची स्पर्धा खेळेल.
-
सानिया आपला शेवटचा ग्रँडस्लॅम खेळण्यासाठी कोर्टवर उतरणार आहे. यावेळी २००९ आणि २०१६ च्या दमदार प्रदर्शनाची पुनरावृत्ती करण्याचा तिचा हा शेवटचा प्रयत्न असेल.
-
सानियाने २००९ मध्ये मिश्र दुहेरीत आणि २०१६ मध्ये महिला दुहेरीत वर्षातील तिचे पहिले ग्रँडस्लॅम जिंकले.
-
ऑस्ट्रेलियन ओपनचे एकेरी सामने १६ जानेवारीपासून सुरू झाले आहेत. दुहेरीचे सामने दोन दिवसांनी म्हणजे १८ जानेवारीपासून सुरू होतील, तर मिश्र दुहेरीचे सामने २१ जानेवारीपासून सुरू होतील. (Photos: Sania Mirza/Instagram)

पैसाच पैसा; मेष राशीत निर्माण होणार बुधादित्य राजयोग, ‘या’ तीन राशींना मिळणर मानसन्मान अन् अचानक धनलाभ