-
भारत आणि न्यूझीलंड यांच्यात खेळल्या जाणाऱ्या तीन सामन्यांच्या वनडे मालिकेचा निर्णय झाला आहे. सलग दोन एकदिवसीय सामने जिंकून भारताने मालिकेत २-० अशी अभेद्य आघाडी घेतली. (फोटो-सौजन्य ट्विटर)
-
पहिल्या सामन्यात भारताने १२ धावांनी रोमहर्षक विजय मिळवला होता. दुसऱ्या सामन्यात ८ गडी राखून विजय मिळवला. (फोटो-सौजन्य ट्विटर)
-
किलर गोलंदाजीच्या जोरावर भारतीय संघाने दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात न्यूझीलंडला अवघ्या १०८ धावांत गारद केले. ग्लेन फिलिप्सने सर्वाधिक ३६ तर मिचेल सँटनरने २७ धावा केल्या. (फोटो-सौजन्य ट्विटर)
-
गेल्या सामन्याचा हिरो मायकेल ब्रेसवेल केवळ २२ धावा करू शकला. कारण या सामन्यात टीम इंडियाची गोलंदाजी उत्कृष्ट होती. (फोटो-सौजन्य ट्विटर)
-
मोहम्मद शमीने ३ तर हार्दिक पांड्या आणि वॉशिंग्टन सुंदरने २-२ विकेट घेतल्या. मोहम्मद सिराज, शार्दुल ठाकूर आणि कुलदीप यादव यांनी १-१ विकेट घेतली. (फोटो-सौजन्य ट्विटर)
-
भारताला न्यूझीलंडला क्लीन स्वीप करण्याची संधी आहे. टीम इंडियाने एकदिवसीय मालिका ३-० ने जिंकल्यास ११३ गुणांसह वनडे क्रमवारीत तिसऱ्या स्थानावर पोहोचेल. (फोटो-सौजन्य ट्विटर)
-
न्यूझीलंडविरुद्धच्या या विजयामुळे ऑस्ट्रेलियाच्या संघाला मोठा धक्का बसणार आहे.वनडे मालिकेत भारताच्या ३-० ने विजयानंतर ऑस्ट्रेलियाचा संघ वनडे क्रमवारीत चौथ्या स्थानावर घसरेल. (फोटो-सौजन्य ट्विटर)
-
पहिले दोन सामने जिंकून भारताचे ११२ गुण झाले आहेत तर ऑस्ट्रेलियाचे ११२ गुण आहेत.जेव्हा न्यूझीलंड संघाने वनडे मालिका खेळायला सुरू केली, तेव्हा ते पहिल्या स्थानावर होते. (फोटो-सौजन्य ट्विटर)
-
परंतु सलग दुसऱ्या पराभवानंतर ते ११७ वरून ११५ गुणांवर आले आहेत. तिसरा पराभव झाल्यास त्याचे ११३ गुण होतील आणि इंग्लंड पहिल्या तर न्यूझीलंड दुसऱ्या स्थानावर पोहोचेल. (फोटो-सौजन्य ट्विटर)

Chhaava: मकरंद अनासपुरे ‘छावा’ पाहिल्यावर म्हणाले, “इतिहासाची मोडतोड…”