-
भारतीय क्रिकेटपटूंनी सोमवारी उज्जैन येथील महाकालेश्वरचे दर्शन घेतले. यावेळी सूर्य कुमार यादव, कुलदीप यादव आणि वॉशिंग्टन सुंदर यांनी भस्म आरतीला हजेरी लावली. महाकालाचे पंचामृत पूजन केले. तिघांनीही ऋषभ पंत लवकर व्हावा यासाठी देवाकडे प्रार्थना केली.
-
भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील एकदिवसीय सामना २४ जानेवारीला इंदूरच्या होळकर स्टेडियमवर खेळला जाणार आहे. या सामन्यासाठी दोन्ही संघ इंदूरला पोहोचले असून यादरम्यान हे तिन्ही खेळाडू इंदूरहून पहाटे उज्जैनला आले.
-
सर्वसामान्य भक्तांसह महाकाल मंदिराच्या गाभाऱ्यात बसलेले सूर्यकुमार यादव, कुलदीप यादव आणि वॉशिंग्टन सुंदर
-
महाकालाला पंचामृताने स्नान घालताना भारतीय क्रिकेटपटू
-
“आम्ही मेहनत करत राहू. बाकी सर्व महाकालच्याच हातात आहे.” असे सूर्यकुमार यादव म्हणाला.
-
इंदूरमध्ये एकदिवसीय सामन्यापूर्वी क्रिकेटपटू महाकालच्या दर्शनासाठी आले होते.
-
या क्रिकेटपटूंनी धोतर नेसून गाभाऱ्यात जाऊन महाकालाचा पंचामृत अभिषेक केला. त्यांच्यासोबत उज्जैनचे खासदार अनिल फिरोजियाही होते.
-
तिन्ही क्रिकेटपटूंनी महाकाल मंदिरात भस्म आरतीला सामान्य भाविकांप्रमाणे हजेरी लावली.
-
सभामंडपात आजूबाजूला बसलेले इतर भक्त त्यांना ओळखू शकले नाहीत. यानंतर या तिघांनीही सामान्य भाविकांप्रमाणे महाकालाचे दर्शन घेतले.
-
महाकालचे दर्शन घेतल्यानंतर सूर्यकुमारने माध्यमांशी संवाद साधला. तो म्हणाले, ‘महाकालचे दर्शन घेऊन खूप छान वाटले. सुरुवातीपासून शेवटपर्यंत आरती पाहिली. यावेळी मन शांत झाले. मुख्य म्हणजे आम्ही तिघांनीही ऋषभ पंतला बरे वाटावे यासाठी प्रार्थना केली. तो बरा व्हावा हेच आपल्या सर्वांसाठी महत्त्वाचे आहे.’ (Photos: ANI)
-
भारतीय संघाचा स्टार क्रिकेटर ऋषभ पंत ३० डिसेंबर रोजी कार अपघातात जखमी झाला होता. रुरकीजवळ त्यांच्या कारला अपघात झाला.
-
या अपघातात पंत गंभीर जखमी झाला होता. तो कारने दिल्लीहून रुरकीला स्वतः गाडी चालवत जात होता. पंतवर मुंबईतील खासगी रुग्णालयात उपचार सुरू असून शुक्रवारी त्याच्या गुडघ्यावर शस्त्रक्रिया झाली. दरम्यान त्यांच्या प्रकृतीत झपाट्याने सुधारणा होत आहे.

पिंपरी- चिंचवड: कुख्यात गुंडाकडून ईदच्या शुभेच्छा; महानगर पालिका, पोलिसांनी केली अशी कारवाई