-
आयसीसीने २०२२ साठी पुरुषांचा सर्वोत्तम टी-२० संघ जाहीर केला आहे. यामध्ये टीम इंडियाच्या तीन खेळाडूंना स्थान मिळाले आहे. ज्यामध्ये विराट कोहली, सूर्यकुमार यादव आणि हार्दिक पांड्याचा समावेश आहे. (फोटो-सौजन्य ट्विटर)
-
ऑस्ट्रेलियात खेळल्या गेलेल्या टी-२० विश्वचषकातही कोहलीने आशिया कपचा फॉर्म कायम ठेवला. मेलबर्नमध्ये पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात त्याने ८२ धावांची नाबाद खेळी खेळली होती. तो या स्पर्धेतील सर्वाधिक २९६ धावा करणारा खेळाडू ठरला होता. (फोटो-सौजन्य ट्विटर)
-
सूर्यकुमार यादव २०२२ या कॅलेंडर वर्षात १००० टी-२० धावा पूर्ण करणारा दुसरा फलंदाज ठरला. २०२२ मध्ये तो ११६४ धावांसह टी-२० मध्ये सर्वाधिक धावा करणारा खेळाडू होता. सूर्यकुमारने गेल्या वर्षी टी-२०मध्ये दोन शतके झळकावली होती. (फोटो-सौजन्य ट्विटर)
-
आयसीसीने जाहीर केलेल्या टी-२० संघात हार्दिक पांड्या हा भारताचा तिसरा खेळाडू आहे. हार्दिक पांड्याने रोहितच्या शर्माच्या गैरहजेरीत टीम इंडियाचे नेतृत्त्व करताना, आपल्या अष्टपैलू कामगिरीने प्रभावित केले. (फोटो-सौजन्य ट्विटर)
-
आयसीसीने २०२२ साठी महिलांचा देखील सर्वोत्तम टी-२० संघ जाहीर केला आहे. ज्यामध्ये चार भारतीय महिला खेळाडूंना स्थान मिळाले आहे. ज्यामध्ये स्मृती मंधाना, दीप्ती शर्मा, ऋचा घोष आणि रेणुका सिंग यांच्या नावांचा समावेश आहे. (फोटो-सौजन्य ट्विटर)
-
भारतीय सलामीवीर स्मृती मंधानासाठी २०२२ हे वर्ष खूप चांगले गेले. तिने २१ डावात ३३ च्या सरासरीने आणि १३३.४८च्या स्ट्राईक रेटने ५९४ धावा केल्या. (फोटो-सौजन्य ट्विटर)
-
दीप्तीने तिच्या अष्टपैलू कामगिरीच्या जोरावर आयसीसी महिला टी-२० संघात स्थान मिळवले आहे. तिने २०२२ मध्ये एकूण २९ विकेट्स आणि ३७० धावा केल्या. (फोटो-सौजन्य ट्विटर)
-
आयसीसीने त्यांच्या संघातील भारतीय युवा प्रतिभा ऋचा घोषला यष्टिरक्षकाची भूमिका सोपवली आहे. १८ सामन्यांमध्ये तिने एकूण २५९ धावा केल्या. (फोटो-सौजन्य ट्विटर)
-
रेणुका सिंगने २०२२ मध्ये २३.९५ च्या सरासरीने आणि ६.५० च्या इकॉनॉमीने एकूण २२ विकेट घेतल्या. रेणुकाने गेल्या वर्षी ऑस्ट्रेलियाविरुद्ध खेळल्या गेलेल्या ७ सामन्यात एकूण ८ विकेट्स घेतल्या होत्या. (फोटो-सौजन्य ट्विटर)

“बलुचिस्तानच्या जन्माची वेळ…”, निवृत्त मेजर जनरल बक्षी यांचं सूचक वक्तव्य; म्हणाले, “स्थिती पाकिस्तानच्या नियंत्रणाबाहेर”