-
भारतीय संघाचा अष्टपैलू खेळाडू अक्षर पटेल विवाह बंधनात अडकला आहे. अक्षर पटेलने प्रेयसी मेहा पटेलसह लग्नगाठ बांधली.
-
कुटुंबीय व मित्रपरिवाराच्या उपस्थितीत अक्षर व मेहाने गुरुवारी(२६ जानेवारी) सप्तपदी घेत नवीन आयुष्याला सुरुवात केली.
-
गुजरातमधील वडोदरा येथे पारंपारिक पद्धतीने दोघांचा लग्नसोहळा पाहर पडला.
-
त्यापूर्वी बुधवारी (२५ जानेवारी) अक्षर पटेल आणि मेहा पटेल यांचा मेहंदी कार्यक्रम पार पडला होता.
-
अक्षर व मेहाच्या शाही विवाहसोहळ्यातील फोटो व व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.
-
अक्षर पटेलने लग्नासाठी पांढऱ्या रंगाची डिझायनर शेरवानी परिधान केली होती. तर मेहाने भरजरी लेहेंगा परिधान करत शाही लूक केला होता.
-
अक्षर पटेलच्या लग्नात क्रिकेटर जयदेव उनाडकटने आपल्या पत्नीसह हजेरी लावली होती. उनाडकटने “Welcome To The Club”, असं म्हणत अक्षरच्या लग्नातील फोटो शेअर केले आहेत.
-
अक्षर पटेल आणि मेहा पटेल अनेक दिवसांपासून एकमेकांना डेट करत होते. त्यानंतर जानेवारी २०२२ मध्ये दोघांनी साखरपुडा केला.
-
अक्षरची पत्नी मेहता ही एक प्रोफेशनल डायटीशियन आहे. मेहा पटेलने आपल्या इन्स्टाग्रामवर अनेक डाएट प्लॅन शेअर केले आहेत. याशिवाय ती डाएटशी संबंधित माहिती देखील शेअर करत असते.
-
अक्षर व मेहा अनेकदा त्यांच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन एकमेकांबरोबरचे फोटो शेअर करायचे.
-
(सर्व फोटो: इन्स्टाग्राम)
अखेर मुसक्या आवळल्या, स्वारगेट बलात्कार प्रकरणातील आरोपी दत्तात्रय गाडेला पुणे पोलिसांनी केली अटक