-
भारताने विश्वचषक जिंकला आणि संपूर्ण क्रिकेट जगताला आपली दखल घेण्यास भाग पाडले. भारताने विश्वचषकाच्या अंतिम फेरीत इंग्लंडवर मोठा विजय साकारला. आव्हानाचा सहजपणे पाठलाग करत भारताने विश्वचषकाला गवसणी घातली. भारताने इंग्लंडला सात विकेट्स राखून पराभूत केले आणि विश्वचषकावर आपले नाव कोरले.
-
सेनवेस पार्क येथे पार पडलेल्या सामन्यात भारतीय महिला संघाने इंग्लंडला धोबीपछाड देत अंडर-१९ विश्वचषकाची पहिली आवृत्ती आपल्या नावावर केली. कर्णधार शफाली वर्माने आपल्या लौकीकला साजेशी खेळी करत अचूक कर्णधारपदाची जबाबदारी पार पाडली.
-
पहिल्यावहिल्या विजयासाठी बीसीसीआयचे सचिव जय शाह यांनी भारतीय संघासाठी तब्बल ५ कोटी रुपयांचे बक्षिस जाहीर केले आहे. त्यांनी ट्वीट करून याबाबत माहिती दिली आहे. ते म्हणतात की, “भारतातील महिला क्रिकेटची प्रगती होत आहे आणि या विश्वचषक विजयाने महिला क्रिकेटचा दर्जा काही अंशांनी उंचावला आहे.
-
भारतीय महिलांनी अंडर-१९ विश्वचषक जिंकल्यानंतर जय शाह यांनी संघाचे ट्विट करून अभिनंदन केले. “अंडर-१९ विश्वचषक जिंकल्याबद्दल भारतीय संघाचे हार्दिक अभिनंदन. आमच्या युवा क्रिकेटपटूंनी देशाला अभिमान वाटावा अशी एक अभूतपूर्व कामगिरी केली आहे.”
-
शफालीला क्रिकेट वर्तुळात लेडी भारताचा माजी सलामीवर वीरेंद्र सेहवाग म्हणून ओळखले जाते. कारण आपल्या आक्रमक खेळीने तिने अनेकांची मनं जिंकून घेतली आहेत. या शेफालीकडे भारताचे नेतृत्व सोपवण्यात आले होते. शफालीकडे आंतरराष्ट्रीय क्रिकेटचा चांगला अनुभव होता. हा अनुभव तिने पणाला लावला आणि भारताला विश्वचषक जिंकवून दिला.
-
भारतीय महिलांनी पहिली वहिली आयसीसी स्पर्धा जिंकण्याचा पराक्रम केला. बीसीसीआयचे सचिव जय शाह यांनी मुलींना अहमदाबाद येथील नरेंद्र मोदी स्टेडियमवर विजयाच्या जल्लोष करण्याचे निमंत्रण दिले. महेंद्रसिंग धोनीच्या नेतृत्वाखाली भारताने पहिला टी२० वर्ल्ड कप जिंकला होता आणि आज शफाली वर्माच्या नेतृत्वाखाली १९ वर्षांखालील पोरींनी तसाच पराक्रम केला.
-
‘म्हारी छोरी छोरोसे कम नही है’ असे म्हणत भारताच्या लेकींनी भारताची मान संपूर्ण जगात उंचावली. इंग्लंडला अक्षरशः लोळवत ७ गडी राखून दणदणीत विजय मिळवला. विश्वचषकावर पहिल्यांदाच नाव कोरत टीम इंडियाने नवा इतिहास रचला. याआधी पुरुषांच्या अंडर-१९ विश्वचषकात देखील भारताने अशीच दिमाखदार कामगिरी केली आहे.
-
भारतीय महिलाच्या अंडर-१९ विश्वचषकातील विजयी कामगिरी नंतर त्यांचा गौरव करण्यात येणार आहे. न्यूझीलंड सोबत सुरू असलेल्या मालिकेतील तिसऱ्या टी२० आधी नरेंद्र मोदी स्टेडियमवर १ फेब्रुवारी रोजी हा सोहळा होणार आहे. बीसीसीआय सचिव जय शाह यांनी ट्विट करून ही माहिती दिली.
-
भारताने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे आणि तो गोलंदाजांनी सार्थ ठरवत इंग्लंडला ६८ धावांवर सर्वबाद केले. तीतस साधूला सामनाविराच्या पुरस्काराने गौरविण्यात आले. तर इंग्लंडची कर्णधार ग्रेस स्क्रिव्हन्सला मालिकावीराच्या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
-
सचिव जय शाह यांनी ट्विट करून ही माहिती दिली. त्यात ते म्हणतात,”मी शफाली वर्मा आणि तिच्या विजयी संघाला आमंत्रित करतो. ती आणि तिचा विजयी संघ आमच्यासोबत नरेंद्र मोदी स्टेडियम, अहमदाबाद येथे सहभागी होईल आणि १ फेब्रुवारी रोजी तिसऱ्या टी२० चे साक्षीदार होईल. ही अतुलनीय कामगिरी साजरी करण्यासाठी निश्चितच उत्सवाची गरज आहे.”
-
शफाली वर्माच्या संघासाठी फलंदाज आणि गोलंदाजांनी तर चांगली कामगिरी केलीच पण क्षेत्ररक्षण हे विजयाचे सर्वात मोठे कारण ठरले. सौम्या तिवारीने थेट थ्रो मारत टीम इंडियाला यश मिळवून दिले.
-
अर्चना देवीने भारतासाठी एका हाताने जबरदस्त झेल घेतला. १२ व्या षटकाचा पहिला चेंडू इंग्लंडच्या रायना मॅकडोनाल्डने कव्हरच्या दिशेने टोलवला. चेंडू अर्चनापासून दूर होता पण तिने हवेत उडी घेत एका हाताने तो चेंडू पकडला. तत्पूर्वी गोंगडी त्रिशानेही सीमारेषेवर उत्कृष्ट झेल घेतला. हा झेल इंग्लंडची कर्णधार ग्रेस स्क्रिव्हन्सचा होता. तिने अर्चना देवीकडे लाँग ऑफच्या दिशेने तो चेंडू टोलवला. तेथे क्षेत्ररक्षण करताना त्रिशाने पुढे उडी मारून चेंडू पकडला.

मासिक पाळी आलेल्या विद्यार्थीनीबरोबर शाळेचं क्रूर कृत्य, आईने व्हिडिओ रेकॉर्ड केल्यामुळे सत्य आलं समोर; चौकशीचे आदेश