-
मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरच्या साथीने शालेय जीवनात क्रिकेट कारकीर्दीला सुरुवात करणाऱ्या विनोद कांबळीची कारकीर्द २०००मध्ये संपुष्टात आली.
-
त्यानंतरही विनोद कांबळी विविध वादग्रस्त कारणांमुळे चर्चेत असायचा. आता पुन्हा विनोद कांबळी चर्चेत आला आहे.
-
नुकतंच विनोद कांबळीवर त्याच्या पत्नीने गंभीर आरोप केले आहेत. मद्यप्राशन करून विनोदने मारहाण तसेच शिवीगाळ केल्याचे त्याच्या पत्नी अँड्रिया हिने आरोप केले आहेत.
-
पत्नीला मारहाण करताना घटनास्थळी कांबळी यांचा १२ वर्षीय मुलगा उपस्थित होता. त्याने वडिलांना थांबवण्याचा प्रयत्न केला ही गोष्टसुद्धा समोर आली आहे.
-
अशा वादग्रस्त कारणांमुळे चर्चेत यायची विनोदची ही पहिली वेळ नाही. याआधीसुद्धा अशा बऱ्याच गोष्टींमुळे विनोद कांबळी चर्चेचा विषय बनायचा.
-
१९९६ चा क्रिकेट विश्वचषक आणि त्यातील सेमी फायनल ही फिक्स्ड असल्याचा दावा विनोद कांबळीने केला होता. त्यावेळी विनोदवर बरीच टीकादेखील झाली होती. भारतीय संघातील फलंदाज तसेच टीमचा मॅनेजर सगळेच यात सामील असल्याचंही कांबळीचं म्हणणं होतं.
-
सोसायटीतील वॉचमॅन आणि काही शेजारी यांच्याशी भांडण आणि तुंबळ मारामारी केल्याप्रकरणी मुंबई पोलीसांनी विनोद कांबळीला एकदा अटकही केली होती.
-
इतकंच नव्हे तर दारूच्या नशेत गाडी चालवण्याबद्दलही विनोदला एकदा बांद्रा पोलीसांनी अटक केली होती.
-
विनोदची पत्नी अँड्रियाने तिला एका मॉलमध्ये गायक अंकित तिवारीच्या वडिलांनी चुकीच्या पद्धतीने स्पर्श केल्याचा आरोप करण्यात आला होता. तेव्हा अँड्रियाने ५९ वर्षीय अंकुर तिवारी यांना भर मॉलमध्ये थोबडावलं होतं. विनोद कांबळीचा या प्रकरणाशी काही संबंध नव्हता, पण नंतर हे प्रकरण चिघळलं आणि पत्नीसह विनोद कांबळीवर केस दाखल करण्यात आली.
-
२०१५ मध्ये या जोडप्यावर पुन्हा एकदा एक गंभीर आरोप लागली. पैशाबद्दल विचारल्यावर या दोघांनी त्यांच्या घरी काम करणाऱ्या मोलकरणीला ३ दिवस एका खोलीत डांबून ठेवल्याचा आरोप विनोद आणि त्याच्या पत्नीवर लागला होता. या प्रकरणात विनोद कांबळीला तुरुंगातही जावं लागलं होतं.
-
माजी क्रिकेटर नवज्योत सिंग सिद्धू, माजी पाकिस्तानी चेअरमॅन रमिज रजा या दोघांना विनोद कांबळीने ट्विटरवर शिवीगाळ करणारी ट्वीट केली होती. प्रकरण जेव्हा तापलं तेव्हा लगेच ती ट्वीट डिलीट करून याबद्दल त्याने माफी मागितली, आणि आपल्या मित्राने ही ट्वीट केल्याचं स्पष्टीकरण विनोदने दिलं.
-
२००९ मध्ये ‘सच का सामना’ या कार्यक्रमात विनोदने आपला मित्र आणि क्रिकेटचा देव मानला जाणाऱ्या सचिन तेंडुलकरवरही आरोप केले. सचिनने आपल्या पडत्या काळात आपली मदत केलं नसल्याचं कांबळीने या कार्यक्रमात जाहीर केलं. शिवाय भारतीय संघात माझ्याबाबतीत कायम भेदभाव केला गेला असंही कांबळीने सांगितलं होतं. त्यानंतर बरीच वर्षं सचिन आणि विनोद यांच्यातील संबंध चांगले नव्हते. (फोटो सौजन्य : इंडियन एक्सप्रेस आणि फेसबुक)

नवरदेव पाहताच नवरी भारावली! पाहुण्यांसमोरच केला भन्नाट डान्स; नवरदेवही लाजला…हौशी नवरीचा VIDEO एकदा पाहाच