-
भारत आणि ऑस्ट्रोलिया यांच्यातल्या बहुचर्चित बॉर्डर-गावस्कर चषक स्पर्धेला आजपासून (९ फेब्रुवारी) सुरुवात झाली आहे. चार कसोटी सामन्यांच्या मालिकेतला पहिला सामना आज नागपूर येथे खेळवला जात आहे.
-
जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेसाठी बॉर्डर-गावस्कर मालिका दोन्ही देशांसाठी खूप महत्त्वाची आहे. केवळ संघच नव्हे तर दोन्ही देशातील अनेक दिग्गज खेळाडूंसाठी ही मालिका खूप महत्त्वाची असणार आहे.
-
भारतासाठी कर्णधार रोहित शर्मा आणि माजी कर्णधार विराट कोहलीचा फॉर्म खूप महत्त्वाचा आहे. हे भारतीय संघातले दोन वरिष्ठ खेळाडू आहेत. या दोन खेळाडूंच्या कामगिरीकडे सर्वांचं लक्ष असणार आहे.
-
रोहित शर्माचं वय ३५ वर्ष तर विराट कोहली ३४ वर्षांचा आहे. टीम इंडियाच्या या दोन वरिष्ठ खेळाडूंसाठी आयसीसी चषक उंचावण्याची ही कदाचित अखेरची संधी ठरू शकते. जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धा आणि बॉर्डर-गावस्कर चषक या स्पर्धांमध्ये उत्कृष्ट कामगिरी करण्याचा मानस या दोन्ही खेळाडूंचा असणार आहे.
-
भारतीय संघ गेल्या १० वर्षांमध्ये एकही आयसीसी चषक जिंकू शकलेला नाही. चाहत्यांना आशा आहे की, यावेळी रोहित आणि विराट त्यांची प्रतीक्षा संपवतील. गेल्या वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिफच्या अंतिम सामन्यात भारताला न्यूझीलंडकडून पराभव पत्करावा लागला होता.
-
कर्णधार रोहित शर्मासाठी ही मालिका खूप महत्त्वाची आहे. कारण रोहितच्या नेतृत्वात भारत पहिल्यांदाच इतक्या मोठ्या स्पर्धेत उतरला आहे. या मालिकेसह भारताचं लक्ष जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम सामन्यावर असेल.
-
टी-20 विश्वचषक २०२२ च्या उप्यांत्य फेरीत भारताला पराभव स्वीकारावा लागला होता. तेव्हा भारतीय संघाची धुरा रोहितच्या हातात होती. तसेच WTC शिवाय रोहित आगामी एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेत भारताचं नेतृत्व करणार आहे. रोहितसाठी हा अखेरचा वर्ल्डकप ठरू शकतो.
-
रोहितप्रमाणे विराट कोहलीच्या कारकीर्दीत देखील या मलिकेला खूप महत्त्व असणार आहे. विराट गेल्या ३ वर्षांमध्ये एकही कसोटी शतक झळकावू शकलेला नाही. २०१९ मध्ये त्याने अखेरचं कसोटी शतक झळकावलं होतं. त्यामुळे विराटसह त्याच्या चाहत्यांना त्याच्या शतकाची प्रतीक्षा आहे.
-
अलिकडच्या काही महिन्यांमध्ये विराटने एकदिवसीय सामन्यात आणि दोन टी-२० सामन्यात शतक झळकावून मर्यादित षटकांच्या क्रिकेटमध्ये आपण फॉर्ममध्ये परतल्याचं दाखवून दिलं आहे. आता कसोटी क्रिकेटमध्ये देखील त्याला पुनरागमन करायचं आहे.
-
याआधीच्या (पहिल्या) जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम सामन्यात विराट कोहली भारताचा कर्णधार होता. यावेळी ही स्पर्धा जिंकून जुनी जखम भरून काढण्याचा प्रयत्न विराट नक्कीच करेल.
-
रोहित आणि विराटप्रमाणे टीम इंडियामधील वरिष्ठ खेळाडू रवीचंद्रन अश्विनसाठी देखील ही मालिका खूप महत्त्वाची आहे. अश्विनचं वय ३६ वर्ष इतकं आहे. मर्यादित षटकांच्या क्रिकेटमध्ये सध्या त्याला संधी मिळण्याची शक्यता कमी आहे. त्यामुळे आयसीसी चषक जिंकण्याची ही त्याची अखेरची संधी ठरू शकते.
-
अश्विनप्रमाणे चेतेश्वर पुजारा आणि रवींद्र जाडेजासाठी देखील बॉर्डर गावस्कर चषक खूप महत्त्वाचा आहे. हे भारतीय संघातील दोन वरिष्ठ खेळाडू आहेत. या दोन खेळाडूंसाठी देखील आयसीसी जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धा जिंकण्याची ही शेवटची संधी असू शकते.
![Sun transit in dhanishta nakshtra](https://www.loksatta.com/wp-content/uploads/2025/02/New-Project-2024-06-08T201503.979.jpg?w=300&h=200&crop=1)
‘या’ तीन राशीच्या व्यक्तींना मिळणार नुसता पैसा; सूर्याचे नक्षत्र परिवर्तन देणार प्रसिद्धी, प्रेम अन् पैसा