-
टीम इंडियात आज दोन खेळाडूंना संघात पदार्पणाची संधी मिळाली. त्यात भारताचा ‘मिस्टर ३६०’ अशी ओळख असणारा सूर्यकुमार यादव आणि यष्टीरक्षक के एस भरत यांना संघात स्थान देण्यात आले.
-
भारतीय संघाकडून आज ‘द- स्काय’अशी ओळख असलेला सूर्यकुमार यादव व अपघातात जखमी झालेला ऋषभ पंतच्या जागी संघात यष्टीरक्षक केएस भरत यांनी पदार्पण केले आहे. यावेळी बीसीसीआयने नवा पायंडा घातला अन् त्यांच्या त्या एका कृतीने चाहत्यांची मनं जिंकली.
-
हे खास क्षण अनुभवण्यासाठी मिस्टर ३६० सुर्यकुमार यादवच्या पत्नी सोबत त्याचे इतर कुटुंबीय देखील उपस्थित होते. या कौतुक सोहळ्याला उपस्थित राहता आल्याबद्दल त्यांनी बीसीसीआयचे आभार मानले.
-
‘मिस्टर ३६०’ अशी बिरुदावली लावून फिरणारा सूर्या आणि यष्टीरक्षक भरत यांना पदार्पणाची कॅप देत असताना बीसीसीआयने त्यांच्या कुटुंबियांना मैदानावर उपस्थित राहण्याची परवानगी दिली.
-
पदार्पणाची संधी मिळालेल्या के एस भरतने त्याच्या आईला मिठी मारलेला फोटो आजचे इंटरनेट सेन्सेशन ठरले. भरत मागच्या काही मोठ्या काळापासून देशांतर्गत क्रिकेटमध्ये चमकदार कामगिरी करत आला आहे.
-
आपल्या कुटुंबियांसमोर हा अविस्मरणीत क्षण अनुभवताना दोन्ही खेळाडू भावूक झाले होते. आजी-माजी मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड आणि रवी शास्त्री यांनीही दोन्ही खेळाडूंच्या कुटुंबियांची भेट घेतली अन् हस्तांदोलन करून त्यांचेही अभिनंदन केले.
-
सूर्यकुमार यादवला रवी शास्त्रींनी तर के एस भरतला चेतेश्वर पुजाराने कसोटी कॅप दिली. तसेच संपूर्ण संघाने त्यांना या पुढील कारकिर्दीसाठी शुभेच्छा देखील दिल्या.
-
अखेर कसोटी पदार्पणाची संधी मिळालेल्या दोन्ही खेळाडूंना राष्ट्रगीता दरम्यान भावना अनावर झाल्या होत्या. देशासाठी खेळताना आपली सर्वोत्तम कामगिरी नोंदवण्याचे मनाशी त्यांनी पक्के केले.
-
आजच्या सामन्यात मिळालेल्या संधीचे सोने करत के एस भरतने कर्णधाराचा विश्वास सार्थ ठरवला. पहिल्याच विकेटसाठी कर्णधाराला रिव्ह्यूसाठी दिलेला कौल योग्य ठरला. तर दुसऱ्या दिवशी दोघांचे फलंदाजी करताना उत्तम कामगिरी करण्याचे लक्ष्य असेल.

RCB vs GT: विराटला गोलंदाजी करता करता थांबला सिराज, दोघेही झाले भावुक; गिलच्या प्रतिक्रियेने वेधलं लक्ष; VIDEO होतोय व्हायरल