-
क्रिकेटच्या तिन्ही फॉरमॅटमध्ये कर्णधार म्हणून शतक झळकावणारा रोहित हा भारताचा पहिला खेळाडू ठरला आहे. हा पराक्रम भारताचा सर्वात यशस्वी कर्णधार धोनी आणि विराटही करता आला नाही. (फोटो-सौजन्य ट्विटर)
-
रोहित शर्मा कर्णधार क्रिकेटच्या तिन्ही फॉरमॅटमध्ये शतक झळकावणारा जगातील चौथा फलंदाज ठरला आहे. त्याच्या अगोदर तिलकरत्ने दिलशान, फाफ डू प्लेसिस आणि बाबर आझम यांनी हा कारनामा केला आहे. (फोटो-सौजन्य ट्विटर)
-
रोहित शर्माने ऑस्ट्रेलियाविरुद्ध सलामीवीर म्हणून भारतासाठी सर्वाधिक शतके झळकावण्याच्या बाबतीत सचिन तेंडुलकरची बरोबरी केली आहे. सचिन आणि रोहितने प्रत्येकी ९ शतकं झळकावली आहेत. (फोटो-सौजन्य ट्विटर)
-
सक्रिय क्रिकेटपटूंमध्ये सर्वाधिक आंतरराष्ट्रीय शतके झळकावण्याच्या बाबतीत रोहित शर्माने स्टीव्ह स्मिथला मागे टाकले आहे. या लिस्टमध्ये विराट कोहली ७४, डेव्हिड वॉर्नर ४५, जो रूट ४४, रोहित शर्मा ४३ तर स्टीव्ह स्मिथने ४२ शतके झळकावली आहेत. (फोटो-सौजन्य ट्विटर)
-
रोहित शर्माने वीरेंद्र सेहवागची बरोबरी केली. ऑस्ट्रेलिया, इंग्लंड आणि दक्षिण आफ्रिकेविरुद्ध मायदेशात कसोटी शतके झळकावणारा, वीरेंद्र सेहवागनंतर रोहित हा दुसरा भारतीय सलामीवीर आहे. (फोटो-सौजन्य ट्विटर)
-
कर्णधार आणि कर्णधार नसताना तिन्ही फॉरमॅटमध्ये शतक झळकावणारा रोहित शर्मा जगातील एकमेव फलंदाज बनला आहे. (फोटो-सौजन्य ट्विटर)
-
रोहित शर्मा घरच्या मैदानावर कसोटी खेळताना सर्वाधिक सरासरी असणारा जगातील दुसरा खेळाडू ठरला आहे. या यादीमध्ये सर डॉन ब्रॅडमॅन (९८.२२), रोहित शर्मा (७५.६६), मार्नस लाबूशेन (७०.५०), क्लायड वालकॉट (६९.८३). (फोटो-सौजन्य ट्विटर)
-
बॉर्डर-गावसकर ट्रॉफीमध्ये शतक झळकावणारा रोहित हा सातवा भारतीय कर्णधार ठरला आहे. विराट कोहली, सचिन तेंडुलकर, मोहम्मद अझरुद्दीन, सौरव गांगुली, अजिंक्य रहाणे आणि एमएस धोनी यांनी यापूर्वी हा पराक्रम केला होता. (फोटो-सौजन्य ट्विटर)
-
दहा वर्षांनंतर भारतीय कर्णधाराने ऑस्ट्रेलियाविरुद्ध मायदेशात शतक झळकावले आहे. याआधी २०१३ मध्ये एमएस धोनीने २२४ धावा करताना हा पराक्रम केला होता. (फोटो-सौजन्य ट्विटर)
IND vs NZ LIVE, Champions Trophy 2025 Final: अक्षर पटेलच्या रूपात भारताला पाचवा धक्का, टीम इंडियाने गाठला २०० धावांचा पल्ला