-
भारतीय क्रिकेटर हार्दिक पांड्याने पत्नी नताशा स्टॅनोविकसह दुसऱ्यांदा लग्नगाठ बांधली.
-
पंड्याने व्हॅलेंटाइन डेचा मुहुर्त साधत १४ फेब्रुवारीला ख्रिश्चन पद्धतीने नताशाशी विवाह केला होता. त्यानंतर त्याने हिंदू पद्धतीनेही नताशाशी लग्न केलं आहे.
-
हिंदू पद्धतीने लग्न केल्यानंतर या सोहळ्यातील काही फोटो त्याने इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत.
-
फोटोंमध्ये नताशा व हार्दिक खूप सुंदर दिसत आहेत.
-
फोटो शेअर करत हार्दिकने ‘Now and forever ❤️’ असं कॅप्शन दिलं आहे.
-
या फोटोंमध्ये हार्दिकने शेरवानी परिधान केली आहे, तर नताशा लेहेंग्यामध्ये खूप सुंदर दिसत आहे.
-
हार्दिकने शेअर केलेल्या फोटोंमध्ये दोघांच्या शाही लग्न सोहळ्याची झलक पाहायला मिळत आहे.
-
दोघांनी हिंदू पद्धतीने केलेल्या त्यांचे कुटुंबीय उपस्थित होते.
-
त्यांच्या लग्नाचे फोटो सोशल मीडियावर चांगलेच चर्चेत आहेत.
-
दोघांवरही चाहते व मित्रांकडून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.
-
हार्दिक व नताशाच्या लग्नात त्यांचा मुलगा अगस्त्य देखील होता.
-
(सर्व फोटो – हार्दिक पंड्याच्या इन्स्टाग्रामवरून साभार)

उन्हाळ्यात कलिंगड खाण्यापूर्वी हा व्हिडिओ पाहा! रंगाचे इंजेक्शन दिलेले कलिंगड कसे ओळखावे? काकुंनी सांगितला सोपा जुगाड