-
भारतीय संघाचा अष्टपैलू खेळाडू आणि ‘लॉर्ड’ म्हणून ओळखला जाणारा शार्दुल ठाकूर सोमवारी विवाहबंधनात अडकला. लग्नापूर्वी या जोडप्याचे हळदीचे फोटोही सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल झाले होते. फोटोंमध्ये त्याची आणि मितालीची जोडी खूपच सुंदर दिसत आहे. (फोटो- इंस्टाग्राम)
-
हळदीच्या फोटोंमध्ये शार्दुलही डान्स करताना दिसत होता. झिंगाट या मराठी गाण्यावर त्याने जबरदस्त डान्स केला. दोघांचा विवाह मुंबई नजीक कर्जत येथे पार पडला. त्यांचे लग्न मराठमोळ्या पद्धतीने पार पडला. लग्नानंतर शार्दुलने आणि मितालीने सोशल मीडियावर एकमेकांसाठी सुंदर संदेश देणारे फोटो शेअर केले आहेत. (फोटो- इंस्टाग्राम)
-
शार्दुल आणि मिताली हे एकमेकांना बालपणापासून ओळखतात. त्यामुळे ते चांगले मित्र आहेत. दोघांनी नोव्हेंबर 2021 मध्ये एंगेजमेंट केली होती. शार्दुलने त्याच्या हळदीच्या कार्यक्रमात जबरदस्त डान्स केला. त्याच्या डान्स पाहून सगळेच अचंबीत झाले होते. (फोटो- इंस्टाग्राम)
-
शार्दुल ठाकूरच्या लग्नाला खास बनवण्यासाठी टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्मा, श्रेयस अय्यर, युझवेंद्र चहलची पत्नी धनश्री वर्मा पोहोचले होते. यादरम्यान श्रेयस अय्यर डान्स करताना दिसला. कॅप्टन रोहित आणि पत्नी रितिका सजदेहनेही शार्दुलच्या संगीत सोहळ्यात जबरदस्त डान्स केला होता. (फोटो- इंस्टाग्राम)
-
शार्दुल आणि मिताली या दोघांचा फोटोही सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यावेळी दोघंही अगदी हटके दिसत होते. मिताली परुळकरसोबत सात फेरे घेतल्यानंतर शार्दुल ठाकूरने सोशल मीडियाच्या माध्यमातून आपला आनंद व्यक्त करत पत्नी मितालीसाठी रोमँटिक पोस्ट टाकली. (फोटो- इंस्टाग्राम)
-
“माझ्या चांगल्या आणि वाईट काळात मला साथ दिल्याबद्दल धन्यवाद, तुझ्यासोबत मी जीवन जगण्याचा खरा अर्थ शिकलो, मी वचन देतो की आजपासून शेवटपर्यंत तुझा मित्र होईन.” असे शार्दुलने पोस्ट मध्ये लिहिले आहे. (फोटो- इंस्टाग्राम)
-
शार्दुल ठाकूरची पत्नी मितीली पारुलकर बेकिंगचा व्यवसाय करते. बिझनेसवुमन मितालीची ठाण्यात ऑल द बेक्स नावाची बेकिंग कंपनी आहे. मिताली सोशल मीडियावर खूप एक्टिव्ह आहे. पण ती लाइमलाइटपासून दूर राहणे पसंत करते. 2021 मध्ये दोघांनी एका खासगी समारंभात साखरपुडा केला होता. (फोटो- इंस्टाग्राम)
-
मिताली परुलकरने 2014 मध्ये मिठीभाई कॉलेजमधून ग्रॅज्युएशन पूर्ण केले. यानंतर तिने जेएसडब्ल्यूमध्ये इंटर्न म्हणून करिअरला सुरुवात केली. तिने अनेक कंपन्यांमध्ये सेक्रेटरी म्हणूनही काम केले आहे. मितालीचा जन्म 1992 मध्ये कोल्हापुरात झाला. (फोटो- इंस्टाग्राम)
-
शार्दुलने ऑगस्ट 2017 मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले. तेव्हापासून तो टीम इंडियासाठी एकूण 8 कसोटी, 34 एकदिवसीय आणि 25 टी-20 आंतरराष्ट्रीय सामने खेळला आहे. कसोटीत त्याने गोलंदाजीत 27 बळी घेतले आहेत. फलंदाजी करताना 254 धावा केल्या आहेत. (फोटो- इंस्टाग्राम)

३० दिवसानंतर शनी देणार नुसता पैसा; ‘या’ तीन राशींच्या व्यक्तींना मिळणार गडगंज श्रीमंतीचे सुख