-
भारतीय क्रिकेटपटू ऋषभ पंतच्या कारला काही महिन्यांपूर्वी अपघात झाला होता.
-
३० डिसेंबर २०२२ ला ऋषभ पंतचा दिल्ली देहरादून महामार्गावर हा अपघात झाला होता.
-
या अपघातामध्ये ऋषभ पंत गंभीर जखमी झाला होता.
-
दिल्लीहून घरी जात असताना भरधाव वेगात असणाऱ्या ऋषभ पंतच्या स्पोर्ट्स कारला भीषण अपघात झाला होता.
-
या अपघातात ऋषभ पंत बचावला असला तरी त्याला गंभीर दुखापत झाली होती.
-
आता ऋषभ पंतची प्रकृती हळूहळू ठीक होत आहे.
-
नुकतंच ऋषभ पंतने IANS न्यूज एजेन्सीला मुलाखत दिली.
-
या मुलाखतीत त्याने क्रिकेटच्या मैदानात परतण्याबद्दल भाष्य केले.
-
“मी सध्या आराम करतो आहे. माझ्या प्रकृतीत सुधारणा होतं आहे.”
-
“मेडिकल टीमच्या सपोर्टनंतर मी लवकरच पूर्वीसारखा फिट अँड फाईन होईन, असा विश्वास मला वाटतो.”
-
“माझा अपघात खरंतर माझ्या जिवावर बेतू शकला असता इतका भयंकर होता.”
-
“अशा अपघातातून वाचणं कठीण असतं, पण मी सुदैवाने बचावलो.”
-
“या अपघातानंतर आयुष्य जगण्याचा एक नवा दृष्टीकोन मला मिळाला.”
-
“मी सकाळी उठून जेव्हा ब्रश करतो, तेव्हाही मला एक वेगळाच आनंद मिळतो.”
-
“छोट्या छोट्या गोष्टी असतात पण आपण त्याच्याकडे खूप दुर्लक्ष करतो.”
-
“मी क्रिकेटच्या मैदानात परतण्यास फारच उत्सुक आहे.”
-
“क्रिकेट हे माझे जीवन आहे.”
-
“मला आजही क्रिकेटची फार आठवण येते.”
-
“आता मी माझ्या पायावर उभं राहण्यावर लक्ष केंद्रीत करत आहे.”
-
“मी पुन्हा क्रिकेट कधी खेळू शकेन, या क्षणाची सध्या प्रतीक्षा करत आहे.”
-
“सध्या माझे फिजिओथेरेपिस्टकडे विविध सेशन सुरु आहेत.”
-
“त्यात व्यायाम, आहार आणि बऱ्याच गोष्टींचा समावेश आहे.”
-
“जोपर्यंत मी नीट चालू शकत नाही तोपर्यंत माझे हे सेशन सुरु असणार आहेत”, असा खुलासा ऋषभ पंतने केला.

लग्नानंतर अडीच वर्षांनी दिली गुडन्यूज! मराठी अभिनेत्रीच्या घरी पाळणा हलणार; डोहाळेजेवणाचे फोटो आले समोर