-
होळी, धुळवड हा रंगांचा सण आहे. होळीच्या निमित्ताने महिला क्रिकेटपटूंनी रंगांची होळी खेळली आहे. वास्तविक, सध्या महिला प्रीमियर लीग खेळली जात आहे ज्यामध्ये परदेशी खेळाडूंचाही समावेश आहे. अशा परिस्थितीत महिला क्रिकेटपटूंनी रंगांचा सण साजरा केला आहे. (सौजन्य- इंस्टाग्राम)
-
ऐन wpl हंगामाच्या परिस्थितीत महिला क्रिकेटपटूंनी रंगांचा सण साजरा केला आहे. सोशल मीडियावर अनेक फोटो व्हायरल झाले आहेत, ज्यामध्ये विदेशी महिला खेळाडू रंगोत्सव उत्साहात साजरा करताना दिसत आहेत. त्याच वेळी, आरसीबीची कर्णधार स्मृती मंधाना देखील तिच्या सहकाऱ्यांसोबत धुळवडीचा आनंद लुटताना दिसत आहे. (सौजन्य- इंस्टाग्राम)
-
महिला प्रीमियर लीग संघ RCBच्या खेळाडूंनी होळी जोरदार खेळली. या रंगोत्सवासाठी संघ व्यवस्थापनाने विशेष तयारी केली होती. (सौजन्य- इंस्टाग्राम)
-
स्मृती मंधाना ते एलिस पेरीपर्यंत सर्वांनी एकमेकांना रंगाने माखून टाकले आहे. टीमने सोशल मीडियावर सर्व चाहत्यांना होळीच्या शुभेच्छा देणारे फोटो शेअर केले आहेत (Happy Holi 2023). (सौजन्य- इंस्टाग्राम)
-
देशभरात होलिका दहनानंतर धुळवड साजरी केली जाते. या दिवशी सर्वजण एकमेकांना रंग लावतात. परदेशी लोकांनाही रंगांचा हा सण खूप आवडतो. आरसीबी महिला संघाने मंगळवारी हा सण साजरा केला. सर्व भारतीय आणि परदेशी खेळाडूंनी मिळून हा सण साजरा केला. (सौजन्य- इंस्टाग्राम)
-
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू हा एक बलाढ्य खेळाडूंचा संघ आहे, पण त्याच संघातील सर्व खेळाडूंनी धुळवडीचा आनंद लुटताना महिला प्रीमियर लीगमध्ये झालेल्या दोन सामन्यातील पराभवातून थोडासा विरंगुळा मिळाला आहे. (सौजन्य- इंस्टाग्राम)
-
पहिल्या २ सामन्यात संघाला पराभवाचा सामना करावा लागला होता. पहिल्या सामन्यात दिल्ली कॅपिटल्सकडून ६० धावांनी पराभूत झाल्यानंतर दुसऱ्या सामन्यात मुंबईने आरसीबीचा ९ गडी राखून पराभव केला. स्मृती मंधानाच्या नेतृत्वाखालील हा संघ अजूनही पहिल्या विजयाच्या शोधात आहे. (सौजन्य- इंस्टाग्राम)
-
हेली मॅथ्यूजची अष्टपैलू कामगिरी आणि नेट सायव्हर ब्रंटच्या शानदार खेळीच्या जोरावर मुंबई इंडियन्सने सोमवारी येथे रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा (आरसीबी) ३४ चेंडू राखून नऊ गडी राखून पराभव केला. (सौजन्य- इंस्टाग्राम)
-
दीप्ती आणि पूनम यांनी देखील रंगांची उधळण करत होळी आणि धुळवडीचा सण दिमाखात साजरा केला. लिलावात यूपी वॉरियर्सने दीप्तीला २.६ कोटी रुपयांची बोली लावून त्यांच्या संघासाठी खरेदी केले. त्याचवेळी दिल्ली कॅपिटल्सने पूनम यादवला ३० लाखांच्या मूळ किमतीत करारबद्ध केले आहे. (सौजन्य- इंस्टाग्राम)
३० दिवसानंतर शनी देणार नुसता पैसा; ‘या’ तीन राशींच्या व्यक्तींना मिळणार गडगंज श्रीमंतीचे सुख