-
भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील बॉर्डर गावसकर मालिकेतील चौथा कसोटी सामना नरेंद्र मोदी स्टेडियम, अहमदाबाद येथे खेळवला जात आहे. या सामन्याची खास गोष्ट म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि त्यांचे ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान अँथनी अल्बानीज कसोटी सामन्याच्या पहिल्या दिवशी स्टेडियममध्ये उपस्थित होते. (Express photo by Nirmal Harindran)
-
आज भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्या मैत्रीला ७५ वर्षे पूर्ण होत आहेत. यानिमित्ताने गुजरातमधील नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये दोन्ही देशांचे पंतप्रधान वेळ घालवणार आहेत. मैत्री साजरी करण्यासाठी क्रिकेट मॅच पाहण्यापेक्षा चांगले काय असू शकते. त्यामुळे दोन्ही पंतप्रधान भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील चौथा कसोटी सामना पाहणार आहेत. (Express photo by Nirmal Harindran)
-
अहमदाबादमध्ये भारतीय संघ आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात कसोटी सामना खेळला जात आहे. दोन्ही देशांचे पंतप्रधान स्टेडियमवर पोहोचले आहेत. पीएम मोदींनी अँथनी अल्बानीज यांचे आलिंगन देऊन स्वागत केले आणि त्यानंतर दोन्ही पंतप्रधानांनी मैदानात लॅप ऑफ ऑनर केले. एका सजवलेल्या रथातून त्यानी मैदानाला फेरी मारली आणि लोकांना अभिवादन केले. (Express photo by Nirmal Harindran)
-
पंतप्रधान मोदी अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये पोहोचले. मिळालेल्या माहितीनुसार, नाणेफेक सकाळी ९ वाजता झाली, तर सामना सकाळी ९.३० वाजता सुरू झाला. सामना सुरू होण्यापूर्वी दोन्ही नेते साइटच्या स्क्रीनसमोर बसले होते. असे सांगितले जात आहे की दोन्ही पंतप्रधान येथे सुमारे २ तास म्हणजे १० ते १०.३० पर्यंत थांबू शकतात. (Express photo by Nirmal Harindran)
-
भारताच्या पहिल्या दौऱ्यावर जाण्यापूर्वीच ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान अल्बानीज यांनी भारतासोबतचे संबंध दृढ करण्याची ही ऐतिहासिक संधी असल्याचे म्हटले होते. अँथनी यांनी ट्विट केले की, “ऑस्ट्रेलिया आणि भारताची समृद्ध मैत्री आहे, जी आमच्या सामायिक हितसंबंधांवर आधारित आहे.” (Express photo by Nirmal Harindran)
-
नरेंद्र मोदी स्टेडियमवर ऑस्ट्रेलियन कर्णधार स्टीव्ह स्मिथने भारतीय पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि ऑस्ट्रेलियन पंतप्रधान अँथनी अल्बानीज यांच्यासोबत सवांद साधला. तसेच त्याने त्याच्या संघाची ओळख करून दिली. (Express photo by Nirmal Harindran)
-
नरेंद्र मोदी आणि अँथनी अल्बानीज या दोघांनी गुरुवारी नरेंद्र मोदी स्टेडियमवर बग्गीची सवारी केली. त्यात त्यांनी संवाद साधताना म्हटले की, “आमची सामायिक लोकशाही मूल्ये, आमच्या लोकांमधील बंधुप्रेम हे प्रेमळ असून दोघांमधील विकासाची स्पर्धा तीव्र आहे. (Express photo by Nirmal Harindran)
-
नाणेफेकीपूर्वी दोन्ही कर्णधारांनी आपापल्या पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अँथनी अल्बानीज यांच्याकडून कसोटी कॅप स्वीकारली. नाणेफेकीनंतर रवी शास्त्री पीएम मोदी आणि ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान अँथनी अल्बानीजसोबत स्टेडियमच्या गॅलरीत पोहोचले. भारतीय क्रिकेटशी संबंधित अनेक खास क्षण येथे जतन करण्यात आले आहेत. रवी शास्त्री यांनी दोन्ही नेत्यांना त्यांच्याबद्दल सांगितले. (Express photo by Nirmal Harindran)
-
पहिल्या दिवसाचा खेळ सुरू होण्यापूर्वी, BCCI अध्यक्ष रॉजर बिन्नी यांनी ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान अँथनी अल्बानीज यांना दोन्ही देशांमधील ७५ वर्षांच्या क्रिकेट संबंधांचे चित्रण करणारी एक विशेष कलाकृती भेट दिली. बीसीसीआयचे सचिव जय शाह यांनी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना एक विशेष कलाकृती सादर केली. यामध्ये दोन्ही देशांमधील ७५ वर्षांचे क्रिकेट संबंध जपले गेले आहेत. (Express photo by Nirmal Harindran)

Chhaava: मकरंद अनासपुरे ‘छावा’ पाहिल्यावर म्हणाले, “इतिहासाची मोडतोड…”