-
अहमदाबाद येथील नरेंद्र मोदी स्टेडियमवर भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यातल्या बॉर्डर गावसकर चषक स्पर्धेतील चौथा कसोटी सामना खेळवला जात आहे. या सामन्यात शुबमन गिल शानदार फलंदाजी करत आहे. तर त्याला भारताचा भरवशाचा फलंदाज चेतेश्वर पुजाराकडून चांगली साथ मिळाली आहे. (PC : Twitter/BCCI)
-
गिल या सामन्यात १२८ धावा करून बाद झाला. तर विराट कोहली ३५ आणि रवींद्र जाडेजा २ धावांवर खेळत आहे. विराट मैदानात येण्यापूर्वी पुजारा आणि गिलमध्ये आश्वासक भागिदारी झाली. दोघांनी दुसऱ्या विकेटसाठी ११३ धावांची भागिदारी केली. (PC : Twitter/BCCI)
-
पुजारा आज १२१ चेंडूत ४२ धावा करून बाद झाला. त्याची आजची खेळी लहान असली तरी त्याआधी त्याने एका मोठ्या विक्रमाला गवसणी घातली आहे. हा विक्रम करत त्याने भारताचे दिग्गज क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर, राहुल द्रविड आणि व्हीव्हीएस लक्ष्मणच्या पंक्तीत स्थान मिळवलं आहे. (PC : Twitter/Cheteshwar Pujara)
-
अहमदाबाद कसोटीतल्या भारताच्या पहिल्या डावात खेळताना पुजाराने ऑस्ट्रेलियाविरुद्ध २,००० कसोटी धावा पूर्ण केल्या आहेत. अशी कामगिरी करणारा तो चौथा भारतीय क्रिकेटपटू बनला आहे. (PC : Twitter/BCCI)
-
ऑस्ट्रेलियाविरुद्ध २००० किंवा त्याहून अधिक धावा फटकावण्याची किमया याआधी सचिन तेंडुलकर, राहुल द्रविड आणि व्हीव्हीएस लक्ष्मणने केली आहे. (PC : Twitter/Cheteshwar Pujara)
-
चेतेश्वर पुजाराचा हा विक्रम खूप खास आहे. कारण ऑस्ट्रेलियाविरुद्ध धावा फटकावण्याच्या बाबतीत त्याने भारताचा स्टार फलंदाज विराट कोहलीला देखील मागे टाकलं आहे. (PC : Twitter/Virat Kohli)
-
विराटने आतापर्यंत ऑस्ट्रेलियाविरुद्ध २४ कसोटी सामन्यांमध्ये १७९३ धावा फटकावल्या आहेत. तर पुजाराने २,००० धावांचा टप्पा पार केला आहे. ही कामगिरी करण्यासाठी पुजाराने देखील २४ सामने घेतले.
-
पुजाराने ऑस्ट्रेलियाविरुद्ध ५ शतकं आणि ११ अर्धशतकं फटकावली आहेत. कांगारुंविरुद्ध त्याची सरासरी ५१ इतकी आहे. (PC : Twitter/Cheteshwar Pujara)
-
पुजाराने ऑस्ट्रेलियाविरुद्ध एक द्विशतकदेखील फटकावलं आहे. मार्च २०१३ मध्ये हैदराबादमध्ये पुजाराने ऑस्ट्रेलियाविरुद्ध २०४ धावांची खेळी साकारली होती. (PC : Twitter/Cheteshwar Pujara)
-
पुजाराने इंदूर कसोटी सामन्याच्या दुसऱ्या डावात ५९ धावांची खेळी केली होती. पुजारा या मालिकेत ऑस्ट्रेलियन गोलंदाजांविरुद्ध संघर्ष करताना दिसला आहे. (PC : Twitter/Cheteshwar Pujara)
-
चौथ्या कसोटीत पुजारा केवळ ४२ धावा करून बाद झाला. परंतु त्याआधी त्याने ऑ्स्ट्रेलियाविरुद्ध २,००० धावांचा टप्पा पार केला आहे. (PC : Twitter/Cheteshwar Pujara)
-
भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातल्या चौथ्या कसोटी सामन्याच्या पहिल्या डावात ऑस्ट्रेलियाने ४८० धावांचा डोंगर उभा केला आहे. त्याच्या प्रत्युत्तरात खेळणाऱ्या भारताने आतापर्यंत ३ बाद २५१ धावा इथवर मजल मारली आहे. (PC : Twitter/BCCI)

Chhaava: मकरंद अनासपुरे ‘छावा’ पाहिल्यावर म्हणाले, “इतिहासाची मोडतोड…”