-
इंडियन प्रीमियर लीगच्या १६ व्या हंगामाला कालपासून (३१मार्च) सुरुवात झाली. अहमदाबाद येथील नरेंद्र मोदी स्टेडियमवर इंडियन प्रीमिअर लीग २०२३ स्पर्धेचा पहिला सामना पार पडला. (PC : Twitter/IPL)
-
आयपीएलमधील पहिल्याच सामन्यात गतविजेता गुजरात टायटन्स आणि चेन्नई सुपरकिंग्स हे दोन संघ भिडले. (PC : Twitter/IPL)
-
या सामन्यात गुजरात टायटन्सने चेन्नई सुपर किंग्जचा पाच गडी राखून पराभव केला. या विजयासह गुजरातने चेन्नईविरुद्धची आपली अपराजित मोहीम सुरू ठेवली. सीएसकेवरचा हा त्यांचा सलग तिसरा विजय आहे. (PC : Twitter/IPL)
-
दरम्यान, हा सामना जरी गुजरातने जिंकला असला तरी चेन्नई सुपरकिंग्सचा कर्णधार महेंद्रसिंह धोनीने एक मोठा रेकॉर्ड आपल्या नावे केला आहे. (PC : Twitter/IPL)
-
आयपीएलसह आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये एमएस धोनीच्या नावावर फलंदाजी आणि यष्टीरक्षणाच्या विभागात अनेक विक्रम आहेत. परंतु यावेळी धोनीने कर्णधार म्हणून एक विक्रम स्वतःच्या नावे केला आहे. (PC : Twitter/IPL)
-
गुजरातविरुद्धच्या सामन्यात नाणेफेक होताच धोनी आयपीएलमध्ये एखाद्या संघाचं नेतृत्व करणारा सर्वात वयस्कर खेळाडू ठरला आहे. धोनीचं वय ४१ वर्ष २६७ दिवस इतकं आहे आणि तो आता आयपीएलमधील सर्वात वयस्कर कर्णधार बनला आहे. (PC : Twitter/IPL)
-
धोनीने राजस्थान रॉयल्सचा माजी कर्णधार शेन वॉर्नचा विक्रम मोडित काढला आहे. शेन वॉर्नने ४१ वर्ष २४९ दिवस इतकं वय असताना राजस्थानच्या संघाचं नेतृत्व केलं होतं. २०११ साली तो अखेरचा सामना खेळला होता.
-
धोनी २००८ पासून म्हणजेच पहिल्या आयपीएलपासून चेन्नई सुपरकिंग्सचं नेतृत्व करत आहे. तसेच धोनीने कर्णधार म्हणून २०२१ मध्ये चेन्नईला आयपीएल चॅम्पियन बनवलं होतं. तेव्हा त्याचं वय ४० वर्ष ७० दिवस इतकं होतं. आयपीएल चॅम्पियन होणारा धोनी सर्वात वयस्कर कर्णधार ठरला होता.
-
धोनीसाठी यंदाची आयपीएल स्पर्धा ही अखेरची ठरू शकते. कारण यावर्षी तो आयपीएलमधून निवृत्ती घेणार असल्याची चर्चा आहे. (PC : Twitter/@CricCrazyJohns)

नवरदेव पाहताच नवरी भारावली! पाहुण्यांसमोरच केला भन्नाट डान्स; नवरदेवही लाजला…हौशी नवरीचा VIDEO एकदा पाहाच